शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

कामात हयगय केल्यास कारवाई

By admin | Updated: June 4, 2016 00:21 IST

जलयुक्त शिवार २०१५-१६ मध्ये घेण्यात आलेल्या भंडारा तालुक्यातील माटोरा, कवलेवाडा, खुर्शीपार आणि रावणवाडी या गावातील कामांची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जलयुक्त शिवार अभियान कामांची पाहणी भंडारा : जलयुक्त शिवार २०१५-१६ मध्ये घेण्यात आलेल्या भंडारा तालुक्यातील माटोरा, कवलेवाडा, खुर्शीपार आणि रावणवाडी या गावातील कामांची पाहणी गुरुवार रोजी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केली. यावेळी माटोरा येथील माजी मालगुजारी तलावाचे काम सुरू न करणाऱ्या कृषी सहाय्यकाची वेतनवाढ रोखण्याचे निर्देश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिले.रणरणत्या उन्हात जिल्हाधिकाऱ्यांनी माटोरा गावातील मामा तलावातील गाळ काढणे, २ सिमेंट नालाबाध, २ नाला खोलीकरण आणि १५ सिंचन विहिरींचे कामाची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मग्रारोहयो अंतर्गत सुरू असलेल्या मामा तलावातील गाळ काढण्याच्या कामावरील मजुरांशी त्यांनी चर्चा केली. गाळ काढणे कठीण असून याकामात कमी मजुरी निघते अशी तक्रार यावेळी उपस्थित महिला मजूरांनी केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अंदाजपत्रकात बदल करण्याच्या सूचना दिल्या. गावातील नागरिकांकडे खुप जूने रेशनकार्ड असल्यामुळे त्यामध्ये नाव काढणे किवा टाकणे शक्य होत नाही. त्यामुळे नवीन रेशन कार्ड बनवून देण्याची मागणी केली. गावाचे सर्वेक्षण करुन सर्वांचे रेशनकार्ड अद्ययावत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी संपत खिलारी यांना दिले आहेत. त्यानंतर नाला खोलीकरणाच्या कामावर उपस्थित मजूरांशीही त्यांनी चर्चा केली. यावेळी कामावर उपस्थित असलेली वयोवृध्द महिला मजूर श्रीमती शिंगाडे यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. सदर महिला निराधार असून तीला कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नसल्याचे तिने सांगितले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर महिलेला संजय गांधी निराधार योजना व घरकुल योजनेच्या प्रतिक्षा यादीत समाविष्ट करण्याच्या सूचना ग्रामसेवकाला दिल्यात. कवलेवाडा येथील मामा तलावाचे कामाची पाहणी तसेच सिमेंट नालाबाधाच्या कामाची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली.खुर्शीपार येथील मग्रारोहयो अंतर्गत सुरू असलेले मामा तलावातील गाळ काढण्याचे काम, कृषी विभागांतर्गत बांधण्यात आलेला सिमेंट नालाबंधारा आणि वन विभागांतर्गत बांधण्यात आलेलया वनतलावाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समेवत उपजिल्हाधिकारी सुनिल पडोळे, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, गटविकास अधिकारी मंजुषा ठवकर, लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता गुप्ता, कृषी विभागाचे अधिकारी, सरपंच, ग्राममसेवक, ग्रामरोजगार सेवक, तलाठी, ग्रामस्थ उपस्थित होते (नगर प्रतिनिधी)