शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणातील आरोपीला कारावास

By admin | Updated: September 20, 2014 23:44 IST

क्षुल्लक कारणावरून २०१२ मध्ये पत्नीची हत्या करण्यात आली. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायधीशांनी आरोपी जगदीश कोठू गजभिये (७५) याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.

मोहाडी : क्षुल्लक कारणावरून २०१२ मध्ये पत्नीची हत्या करण्यात आली. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायधीशांनी आरोपी जगदीश कोठू गजभिये (७५) याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भोसा टाकळी येथील जगदीश गजभिये यांचे २० जुलै २०१२ च्या पहाटेला पत्नी कांताबाईशी वाद झाला. यात वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात जगदीशने पत्नीवर चाकूने सपासप वार केले. यात ती गंभीर जखमी झाल्याने ओरडू लागली. आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकूण मुलगा अतुल व सून धावत गेले. यावेळी वडिल आईला चाकूने मारीत असल्याचे दिसले. मुलगा व सून येताच जगदीश घराबाहेर पळून गेला. दरम्यान जखमी कांताबाईचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी अतुलने मोहाडी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी जगदीशविरूद्ध गुन्हा नोंदविला. याप्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सहकारी पोलीस हवालदार जगन्नाथ गिऱ्हेपुंजे, संदेश राऊत यांच्या सहकार्याने आरोपीविरूद्ध पुरावे गोळा केले. सदर प्रकरण न्यायदानासाठी जिल्हा सत्र न्यायालयात प्रविष्ट केले.याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश जी.जे. अकर्ते यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकला. पुराव्याच्या आधारावर न्यायधीशांनी जगदीशला दोषी पकडून त्याला आजन्म कारावास व एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणात अ‍ॅड. आय.ए. सिद्धीकी यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली तर आरोपीकडून अ‍ॅड. यु.के. फटी यांनी युक्तीवाद केला. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार शास्त्री यांनी काम पाहिले. (शहर प्रतिनिधी)