शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ९.१२ लाख मतदार

By admin | Updated: September 13, 2014 01:04 IST

महाराष्ट्रात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगूल वाजला असून जिल्ह्यातही राजकीय घडामोडीला वेग आला आहे.

भंडारा : महाराष्ट्रात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगूल वाजला असून जिल्ह्यातही राजकीय घडामोडीला वेग आला आहे. मतदार राजा पुन्हा एकदा झोतात येणार असून दि.१५ आॅक्टोंबर रोजी होवू घातलेल्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनही सज्ज झाली आहे. जिल्ह्यात भंडारा, साकोली, तुमसर या तिन्ही विधानसभा मतदार संघात एकूण ९ लक्ष १२ हजार २०८ मतदारांची नोंदणी झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघानिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे. यात भंडारा विधानसभा मतदार संघाचा क्रमांक ६१, तुमसर ६० तर साकोली विधानसभा मतदार संघाचा क्रमांक ६२ आहे. तुमसर विधानसभा क्षेत्रात मतदान केंद्राची संख्या ३५१ असून भंडारा ४२९ तर साकोली विधानसभा क्षेत्रात ३७१ असे एकूण ११५१ मतदान केंद्र राहणार आहेत. तुमसर विधानसभा मतदार संघात एकूण मतदार २ लक्ष ८० हजार २०३ असून यापैकी पुरूष मतदारांची संख्या १ लक्ष ४२ हजार ६०५ तर स्त्री मतदारांची संख्या १ लक्ष ३७ हजार ५९८ आहे. भंडारा विधानसभा मतदार संघात एकूण मतदार ३ लक्ष ३७ हजार ६६७ असून पुरूष मतदारांची संख्या १ लक्ष ७१ हजार ३३३ तर स्त्री मतदारांची संख्या १ लक्ष ६६ हजार ३२२ आहे.साकोली विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार २ लक्ष ९४ हजार ३३८ असून पुरूष मतदारांची संख्या १ लक्ष ५१ हजार ४८ तर स्त्री मतदारांची संख्या १ लक्ष ४३ हजार २८९ इतकी आहे. जिल्ह्यात तृतीयपंथ मतदारांची नोंदणी शुन्य असल्याची माहिती आहे. दि.३१ जुलै रोजी प्रकाशित नवीन यादीत १४ हजार ५३० मतदार वाढले आहेत. यापैकी तुमसर विधानसभा क्षेत्रात ३ हजार ९४२, भंडारा ७ हजार ३०४ तर साकोलीत ३ हजार २८४ मतदार नव्याने वाढले आहेत. (प्रतिनिधी)