जिल्ह्यात २४ तासात ८३.९ मिमी अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 06:00 AM2020-03-15T06:00:00+5:302020-03-15T06:00:20+5:30

साधारणत: अर्धा तास पाऊस कोसळला. त्यामुळे शहरातील काही भागातील वीज पुरवठाही खंडीत झाला होता. मोहाडी तालुक्यात शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. मोहाडी, महालगाव, मोरगाव, कुशारी, दहेगाव, पारडी, सिरसोली, कान्हळगाव आदी भागात बोराच्या आकाराच्या गारा कोसळल्या. तालुक्यात २४ तासात १६.५ मिमी पावसाची नोंद झाली.

83.9 mm rains in the district in 24 hours | जिल्ह्यात २४ तासात ८३.९ मिमी अवकाळी पाऊस

जिल्ह्यात २४ तासात ८३.९ मिमी अवकाळी पाऊस

Next
ठळक मुद्देगारांचा वर्षाव । सर्वाधिक पाऊस लाखांदूर तालुक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गत महिनाभरापासून जिल्ह्यात एक दिवसाआड अवकाळी पाऊस बरसत असून गत २४ तासात तर तब्बल ८३.९ मिमी पावसाची नोंद झाली. तुमसर आणि मोहाडी तालुक्यात गारांचा वर्षाव झाला. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस लाखांदूर तालुक्यात ३०.२ मिमी नोंदविण्यात आला आहे. या अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या रबी पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.
भंडारा शहरात रात्री ११.३० वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटात मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. साधारणत: अर्धा तास पाऊस कोसळला. त्यामुळे शहरातील काही भागातील वीज पुरवठाही खंडीत झाला होता. मोहाडी तालुक्यात शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. मोहाडी, महालगाव, मोरगाव, कुशारी, दहेगाव, पारडी, सिरसोली, कान्हळगाव आदी भागात बोराच्या आकाराच्या गारा कोसळल्या. तालुक्यात २४ तासात १६.५ मिमी पावसाची नोंद झाली. मोहाडी मंडळात २२.४ मिमी, वरठी ७.२ मिमी, करडी ३.४ मिमी, कांद्री १८.४ मिमी, कान्हळगाव २७.५ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तुमसर तालुक्यात २४ तासात २९.४ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस गर्रा मंडळात ४१ मिमी नोंदविण्यात आला. नाकाडोंगरी ५.३ मिमी, तुमसर १२.१ मिमी, सिहोरा ३०.१ मिमी, मिटेवानी २६.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पवनी तालुक्यातील पवनी मंडळात ३८.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यासोबतच आसगाव १६.४ मिमी, आमगाव २१.२ मिमी, कोंढा ३.६ मिमी, चिचाळ ९१ मिमी पाऊस कोसळला. साकोलीत १६.४ मिमी पावसाची नोंद झाली असून त्यात साकोली मंडळात १७.२ मिमी, एकोडी ७.२ मिमी, सानगडी २५ मिमी पाऊस कोसळला. लाखनी तालुक्यातील पोहरा मंडळात २३.४ मिमी, लाखनी ७.२ मिमी, पालांदूर २७.८ मिमी, पिंपळगाव १२.४ मिमी पाऊस कोसळला. लाखांदूर तालुक्यात गत २४ तासात ३०.२ मिमी पावसाची नोंद झाली असून लाखांदूर मंडळात २९ मिमी, बारव्हा ३५.४ मिमी, मासळ ३३ मिमी, विरली २३ मिमी पावसाची नोंद झाली.

काढणीला आलेल्या पिकांना फटका
भंडारा जिल्ह्यात सध्या रबी हंगामातील पिकांची काढणी सुरु आहे. अनेक शेतकऱ्यांनी हरभरा लाखोळी, वाटाणा आदी पिकांची कापणी करून शेतात ढिग लावून ठेवले आहे. मात्र गत काही दिवसांपासून ढगाळ वातावरणांसह पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी रात्री तर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतातील कापून ठेवलेले पीक ओले झाले. अनेक शेतकऱ्यांनी ताडपत्रीने पीक झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु वादळामुळे ताडपत्र्या उडून गेल्या.
तालुकानिहाय पाऊस
भंडारा १.६ मिमी, मोहाडी १६.५मिमी, तुमसर २९.४ मिमी, पवनी २०.५ मिमी, साकोली १६.४ मिमी, लाखांदूर ३०.२ मिमी, लाखनी १७.७ मिमी

Web Title: 83.9 mm rains in the district in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस