शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

८० सागवान वृक्षांची परवानगीविना कत्तल

By admin | Updated: August 25, 2016 00:26 IST

वृक्षसंवर्धन व वृक्षतोडीची जबाबदारी वन विभागावर आहे. भंडारा वनविभाग कार्यालयातील ८० सागवान व १२९ आडजात झाडे ...

भंडारा वनविभागातील प्रकार : अधिकाऱ्यांचे एकमेकांकडे अंगुलीनिर्देशप्रशांत देसाई भंडारावृक्षसंवर्धन व वृक्षतोडीची जबाबदारी वन विभागावर आहे. भंडारा वनविभाग कार्यालयातील ८० सागवान व १२९ आडजात झाडे आॅक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात तोडण्यात आली. मात्र, या वृक्षतोडीला परवानगीच नसल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे.भंडारा वनविभागाचे विभागीय कार्यालय व वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयातील ही वृक्षतोड आॅक्टोबर व नोव्हेंबर २०१५ मध्ये करण्यात आलेली आहे. वनविभागाचे विभागीय कार्यालय व वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय हे भंडारा नगरपालिका क्षेत्रात येते. त्यामुळे वनविभाग वृक्षांचे पालक असले तरी, हे वृक्ष तोडण्यासाठी वनविभागालाही वृक्षतोडीचे अधिकार नाहीत. वनविभागाला अशास्थितीत वृक्षतोड करण्यासाठी ‘वृक्षाधिकारी’ असलेल्या पालिका मुख्याधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. त्यांच्या परवानगीशिवाय वृक्षतोड नियमबाह्य ठरते. त्यानुसार, भंडारा वनविभागाच्या विभागाीय कार्यालय व वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयातील वृक्षतोड करण्यासाठी पालिकेकडून परवानगी घेण्याची गरज आहे.कार्यालयाचा विस्तार करण्याचा मुद्दा समोर करून वनविभागाने विभागीय कार्यालयातील काही वृक्षांना तोडण्याचा प्रस्ताव ११ सप्टेंबर २०१५ रोजी पालिकेकडे सादर केला. त्यानुसार पालिकेने ६ नोव्हेंबर २०१५ ला एक जांभूळ व सागवानाचे ११ वृक्ष तोडण्याची परवानगी दिली. सरसकट वृक्षतोडीची परवानगी नसताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील सर्वच झाडे तोडण्याचा गंभीर प्रकार केला आहे. आता मात्र प्रकरण अंगलट येईल, या भितीने अधिकाऱ्यांनी सावरासावर तथा कनिष्ठांवर जबाबदारी सोपविली होती, अशी भूमिका घेऊन स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान पालिकेने किती वृक्षतोडीची परवानगी दिली याबाबत तत्कालीन मुख्याधिकारी रविंद्र देवतळे यांना विचारले असता त्यांनी, ६ नोव्हेंबरला १२ वृक्षतोडीची परवानगी दिली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांचे परवानगी पत्र प्राप्त झाले. त्याबाबत निश्चित सांगता येत नाही. त्यानंतर परवानगी विभागाचे आठले यांच्याशी संपर्क साधला असता कार्यालयातील दस्तावेज बघून सांगावे लागेल, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.२०९ वृक्ष विनापरवाना तोडलेवनविभागाने पुन्हा वृक्ष तोडण्याची परवानगी मागितली. यात सागवान ८० वृक्ष तर आडजात १२९ वृक्षांचा समावेश होता. यात विभागीय कार्यालयातील सागवान ५७ व आडजात ८० व वनपरिक्षेत्र कार्यालयातील २३ सागवान व ४९ आडजात वृक्षांचा समावेश आहे. या वृक्षांना तोडण्याची परवानगी पालिकेने अद्याप वनविभागाला दिलेली नाही. असे असतानाही वनविभागाने त्यांच्या कार्यालय परिसरातील वनसंपदांची कत्तल केल्यानंतर त्यांची गडेगाव लाकूड आगारात कोट्यवधी रुपयात लिलाव करण्यात आला. यातूनही लिलाव घेणाऱ्यांची चक्क वनविभागानेच फसगत केल्याचा हा प्रकार आता उघडकीस आल्याने सर्वांनी एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रकार सुरु आहे.ही वृक्षतोड उपवनसंरक्षक प्रवीणकुमार यांच्या कार्यकाळात झालेली आहे. त्यांच्या निर्देशानुसार सर्व काम झालेले आहे. माझा यात हस्तक्षेप नसून मला याची माहिती नाही.- संजय मेश्राम, वनपरिक्षेत्राधिकारी, भंडारा.