७९ पैकी ७२ नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 05:00 AM2020-04-10T05:00:00+5:302020-04-10T05:00:55+5:30

कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाय योजले आहेत. सुदैवाने जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण अद्यापपर्यंत आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून ७९ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. गुरुवारी ३४ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला असून सर्व निगेटिव्ह आले आहे.

72 out of 79 samples were negative | ७९ पैकी ७२ नमुने निगेटिव्ह

७९ पैकी ७२ नमुने निगेटिव्ह

Next
ठळक मुद्देसात अहवालांची प्रतीक्षा : हॉस्पीटल क्वारंटाईनमधून ४४ जणांना सुटी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर! जिल्हा रुग्णालयातून कोरोना संदर्भात तपासणीसाठी पाठविलेल्या ७९ नमुन्यांपैकी ७२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर सात अहवालांची प्रतीक्षा आहे. नर्सिंग वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या ४४ जणांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही कोरोणाग्रस्त रुग्ण आढळून आला नाही. मात्र प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करीत असून संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करणाऱ्यावर भर दिला जात आहे.
कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाय योजले आहेत. सुदैवाने जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण अद्यापपर्यंत आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून ७९ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. गुरुवारी ३४ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला असून सर्व निगेटिव्ह आले आहे. आतापर्यंत प्राप्त सर्वचा सर्व म्हणजे ७२ नमुने निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला व आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. अद्याप सात अहवालांची प्रतीक्षा आहे.
मुंबई, पुणे व इतर राज्यातून १ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत १८ हजार २०१ व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाले आहे. या सर्वांची रॅपिट रिस्पॉन्स टीमने भेट घेवून तपासणी केली. यासर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या नर्सिंग वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षात १३ व्यक्ती दाखल आहे. तर आतापर्यंत ४४ जणांना सुटी देण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नाही. मात्र प्रशासन प्रत्येक बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असल्याने प्रादूर्भावावर निर्बंध आला आहे.

होम क्वारंटाईनचा कालावधी २८ दिवसांचा
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार २०१ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. पूर्वी होम क्वारंटाईनचा कालावधी १४ दिवसाचा होता. मात्रा आता तो दुप्पट म्हणजे २८ दिवसांचा करण्यात आला आहे. या कालावधीत होम क्वारंटाईनचा शिक्का असलेल्या व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये असे आदेश देण्यात आले आहेत. घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

आयसोलेशन वॉर्डात सहा व्यक्ती
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सहा व्यक्ती दाखल असून आतापर्यंत सात व्यक्तींना येथून सुटी देण्यात आली आहे. गुरुवारी १३ व्यक्तींना हॉस्पीटल क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात कोरोना संदर्भात सुसज्ज यंत्रणा कार्यरत आहे. तर जिल्ह्यातील नऊ चेक पोस्टवर प्रत्येक वाहनांची तपासणी होत असून वैद्यकीय पथक तैनात आहे.

Web Title: 72 out of 79 samples were negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.