शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

७०० पेटी ‘मॅगी’ रिटर्न

By admin | Updated: June 11, 2015 00:26 IST

‘मॅगी’मध्ये शरीरास हानीकारक घटक आढळून आल्यामुळे केंद्र व राज्य शासनाने नेस्ले कंपनीची ‘दोन मिनट... वाली मॅगी’वर बंदी...

लाखोंची उलाढाल थांबलीमहिन्याकाठी व्हायची १५ लाखांची विक्रीप्रशांत देसाई भंडारा‘मॅगी’मध्ये शरीरास हानीकारक घटक आढळून आल्यामुळे केंद्र व राज्य शासनाने नेस्ले कंपनीची ‘दोन मिनट... वाली मॅगी’वर बंदी घातली आहे. सरकारच्या बंदीमुळे भंडारा जिल्ह्यात महिन्याकाठी विकली जाणारी सुमारे १५ लाखांच्या मॅगी विक्रीची उलाढाल थांबली आहे. परिणामी, मागील अनेक वर्षांपासून मॅगीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या ‘गल्ल्यावर’ याचा फटका बसला आहे. बंदीमुळे जिल्ह्यातील मॅगीच्या ७०० पेटी कंपनीकडे परत पाठविण्यात आले आहे.नेस्ले कंपनीचे उत्पादन असलेल्या मॅगीला घराघरात मोठी मागणी होती. विशेषत: बच्चे कंपनीचे मॅगी हे सर्वाधिक पसंतीचे खाद्यपदार्थ होते. मात्र, मॅगी नूडल्सच्या १३ पैकी १० नमुने तपासणीत शिसे आणि मोनो सोडियम ग्लुटामेटचे (अजिनोमोटो) प्रमाण आढळून आले. हे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक आढळून आल्याने, ते मानवी शरीरास खाण्यायोग्य नसून आरोग्यास हानीकारक घटक असल्याचे समोर आले.यामुळे केंद्र व राज्य शासनाने नेस्लेच्या मॅगी उत्पादनावर विक्रीसाठी बंदी आणली. याची अंमजबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने अन्न व औषधी प्रशासनाला आदेश दिल्यानंतर या विभागाने जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना सुचना देऊन असलेला स्टॉक जमा करण्याचे निर्देश दिले. याप्रकरणी भंडारा अन्न व औषधी प्रशासनाने येथील मॅगीचे जिल्हा वितरक बृजलाल केसवलाल टेडर्सचे मनोज संघानी यांना सूचना देऊन त्यांच्याकडील साठा कंपनीला परत करण्याचे निर्देश दिले.भंडारा जिल्ह्यात महिन्याकाठी मॅगीच्या सुमारे एक हजार पेटीची विक्री व्हायची. यातून १५ लाखांची आर्थिक उलाढाल होत होती. मॅगीवरच्या बंदीमुळे आर्थिक व्यवहारावर मोठा परिणाम पडला आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यातील किरकोळ दुकानदारांकडे असलेला मॅगीचा साठा परत घेण्यासाठी यंत्रणा गुंतलेली आहे. आतापर्यंत मॅगीच्या ७०० पेटी कंपनीला परत पाठविण्यात आलेल्या आहेत. बाजारात सुमारे ४०० पेटी मॅगी असून ती येत्या दोन दिवसात परत मागवून कंपनीला पाठविण्यात येणार असल्याचे अन्न व औषध विभागाने सांगितले. मॅगी बंदीच्या कारवाईने बच्चे कंपनीची आवडती मॅगी जिल्ह्यातील एकाही दुकानात विकली जात नसल्यामुळे बाजारपेठ ‘मॅगी’विरहीत झालेली आहे.अन्य उत्पादनावरही परिणामनेस्ले कंपनीचे अनेक उत्पादन बाजारात विक्रीसाठी आहेत. मॅगीत शरीरास हानिकारक तत्व आढळल्याने त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. यामुळे बाजारातून मॅगी हद्दपार झाली आहे. नागरिकांनी याची धास्ती घेऊन नेस्लेचे अन्य उत्पादन खरेदी करण्यास घाबरत आहेत. त्यामुळे नेस्लेच्या अन्य उत्पादनाच्या विक्रीवर मंदीचे सावट ओढवले आहे.नेस्ले कंपनीच्या उत्पादनांचे मागील ५० वर्षांपासून जिल्ह्यात वितरण करीत आहे. मॅगी विक्रीतून महिन्याला १५ लाखांची उलाढाल व्हायची. बंदीमुळे गल्ल्यावर आर्र्थिक परिणाम झाला आहे. आतापर्यंत मॅगीच्या ७०० पेटी कंपनीला परत पाठविले असून, दोन दिवसात मॅगीच्या ३०० पेटी जमा केले असून आठवडाभरात उर्वरित ४०० पेटी कंपनीला परत पाठविण्यात येईल.- मनोज संघानीजिल्हा वितरक, नेस्ले कंपनी, भंडारा.