शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

६७ मुख्याध्यापक बनले सहायक शिक्षक

By admin | Updated: August 20, 2014 23:20 IST

दीडशेपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत ६७ उच्चश्रेणी मुख्याध्यापकांवर गंडांतर आले असून या मुख्याध्यापकांना पदावनत करून सहायक शिक्षक बनविण्यात आले आहेत.

आरटीई अ‍ॅक्टचा फटका : समायोजन झालेप्रशांत देसाई - भंडारादीडशेपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत ६७ उच्चश्रेणी मुख्याध्यापकांवर गंडांतर आले असून या मुख्याध्यापकांना पदावनत करून सहायक शिक्षक बनविण्यात आले आहेत. बोगस विद्यार्थी दाखूवन अनेक खाजगी शाळा महाविद्यालयामध्ये शासनाचे अनुदान लाटल्या जात होते. यासोबतच शाळाबाह्य विद्यार्थ्यांचीही संख्या दाखविण्यात येत असल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले होते. खाजगी शाळांचे कारनामे बाहेर यावे व शासकीय अनुदानाची लूट होऊ नये, यासाठी राज्य शासनाने बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (आरटीई अ‍ॅक्ट) कायदा लागू केला. या कायद्यामुळे बोगस विद्यार्थी संख्या व पटपडताळणी यातून पळवाटा काढणाऱ्या शाळांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात ७६९ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये १४६ मुख्याध्यापकांची पदे असून १४२ पदे भरली आहेत. उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या ६७ मुख्याध्यापकावर आरटीई अ‍ॅक्टनुसार पदावनतीची कारवाई करण्यात आली असून त्या सर्वांना सहायक शिक्षक म्हणून आता जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. आरटीई अ‍ॅक्टनुसार पहिली ते सातवी आणि पहिली ते आठवी या शाळांमध्ये दीडशेपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचे पद यामुळे गोठविण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांचे सर्वेक्षण करून अतिरिक्त मुख्याध्यापकांची यादी तयार करून ही कारवाई करण्यात आली आहे. पदावनती होणार असल्याने मुख्याध्यापकांच्या ग्रेड-पे ला कात्री लागणार आहे. मुख्याध्यापकाला सहायक शिक्षकाची जबाबदारी सांभाळावी लागण्याची नामुष्की ओढावणार आहे. उच्चश्रेणी शाळेचे हे ६७ मुख्याध्यापक एचएससी डी.एड. पात्रताधारक आहेत. मात्र नवीन कायद्यानुसार आता इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत प्राथमिक शिक्षक गणले जाणार आहेत. त्यामुळे या शाळेवर असलेल्या मुख्याध्यापकाची पात्रता पदवीधर असणे गरजेचे आहे. त्यामुळे पदवीधर नसलेल्या उच्चश्रेणी शाळेच्या मुख्याध्यापकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. ६७ पदावनत मुख्याध्यापकांपैकी १० शिक्षक हे पदवीधर असल्याने त्यांना समकक्ष पदावर सामावून घेण्यात आले आहे. मात्र ५७ मुख्याध्यापकावर गंडांतराची कारवाई होणार आहे. कला शिक्षक नाहीजिल्हा परिषद उच्च प्राथमिक अथवा प्राथमिक शाळेतील ७६९ शाळांपैकी एकाही शाळेवर कला शिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. कला शिक्षकाअभावी येथील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळणे दुरापस्त झाले आहे.