शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोसरा येथे मधमाशांचा हल्ल्यात २५ जण जखमी

By admin | Updated: October 8, 2014 23:20 IST

कोसरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकावर मधमाशानी हल्ला केला. त्यामुळे लोक भयभीत होवून सैरावैरा पळू लागले. मधमाशांनी २० ते २५ लोकांना दंश करून जखमी

कोंढा (कोसरा) : कोसरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकावर मधमाशानी हल्ला केला. त्यामुळे लोक भयभीत होवून सैरावैरा पळू लागले. मधमाशांनी २० ते २५ लोकांना दंश करून जखमी केल्याची घटना दि.६ रोजी घडली. कोसरा ग्रामपंचायतीचे कर्मचारी दादाराव गभने यांचे दि.५ च्या रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दि.६ रोजी सकाळी गावातील नागरिक व नातेवाईक मोठ्या संख्येने कोसरा स्मशानभूमीत पोहचले. यावेळी शोकसभा घेण्यात आली. घरी जाण्याच्या अगोदर चितेवर धर्मकाडी टाकून नमस्कार करीत असताना सभोवताल जमलेल्या नागरिकांवर मधमाशानी काही कळायच्या आत अचानक हल्ला केला. त्यामुळे नागरिक सैरावैरा पळू लागले. अनेकांनी आपल्या मोटारसायकल स्मशानभूमीतच ठेवून गावाच्या दिशेने पळ काढला. यात २० ते २५ व्यक्तींना मधमाशांनी दंश करून त्यांना गंभीर जखमी केले. यामध्ये कोसरा व बाहेरगावचे नागरिक देखिल मोठ्या संख्येने होते. कोसरा येथील गणबा कामथे, भागवत लाखे, सुरेश गाखरे, जनार्धन मेश्राम, विलास मेश्राम, राजू चौधरी, सुनिल वाढई यांच्या हातपायाला व नाकातोंडाला मधमाशानी दंंंंंश केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. (वार्ताहर)