शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीविना वृक्ष कटाईवर २.३० लाखांचा खर्च

By admin | Updated: September 1, 2016 00:45 IST

पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्षांचे जतन करण्याची जबाबदारी वनविभागावर असली तरी भंडारा वनविभागाच्या कार्यालयातील

भंडारा वनविभागातील प्रकार : दोषी वनाधिकाऱ्यांना मिळतेय अभयप्रशांत देसाई भंडारापर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्षांचे जतन करण्याची जबाबदारी वनविभागावर असली तरी भंडारा वनविभागाच्या कार्यालयातील ८० सागवान व १२९ आडजात वृक्षांची आॅक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात परवानगीविना तोडण्यात आली. या वृक्षतोडीवर वनविभागाने २ लाख २९ हजार ६७९ लाखांचा खर्च केल्याची बाब आता समोर आली आहे. असे असतानाही दोषी वनाधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून अभय मिळत आहे.भंडारा वनविभागाचे विभागीय कार्यालय व वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयातील ही वृक्षतोड आॅक्टोंबर व नोव्हेंबर २०१५ मध्ये करण्यात आली. वनविभागाचे विभागीय कार्यालय व वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय हे भंडारा नगरपालिका क्षेत्रात येते. त्यामुळे वनविभाग वृक्षांचे पालक असले तरी, या वृक्षांची तोड करण्यासाठी वनविभागालाही वृक्षतोडीचे अधिकार नाही. वनविभागाला अशास्थितीत वृक्षांची तोड करण्यासाठी वृक्षाधिकारी असलेल्या पालिका मुख्याधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. त्यांच्या परवानगीशिवाय वृक्षांची तोड नियमबाह्य आहे. असे असतानाही वनविभागाने त्यांच्या कार्यालय परिसरातील साग व अन्य प्रकारच्या वृक्षांची तोड करण्यासाठी अंदाजपत्रक तयार केले होते. परंतु पालिकेची परवानगी न घेताच सदर विभागाने वृक्षांची तोड केली. प्रकरण अंगलट येईल या भीतीने वनाधिकाऱ्यांनी पालिकेकडे परवानगीचा पत्रव्यवहार केला. पालिकेने १२ वृक्ष कटाईची परवानगी दिली. मात्र त्यानंतरच्या वृक्ष कटाईसाठी आलेले प्रकरण अद्याप पालिकेकडे पडून आहे. त्यामुळे उर्वरित वृक्षांची केलेली कटाई परवानगीविना केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. परवानगीविना केलेल्या वृक्ष कटाईवर वनविभागाने २ लाख २९ हजार ६७९ हजारांचा खर्च केलेला आहे. अंदाजपत्रकानुसार विभागाीय कार्यालयातील ५७ सागवान, ८० आडजात वृक्षांची तर वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयातील २३ सागवान व ४९ आडजात वृक्षांची अशा ८० सागवान व १२९ आडजात वृक्षांची कटाई करायची होती. मात्र, पालिकेने परवानगी दिलेली नसतानाही सुमारे २०० वृक्षांची सर्रासपणे कटाई करण्यात आली. कटाई व छटाईवर वनविभागाचा खर्चविभागीय कार्यालयातील वृक्षांच्या कटाईवर १३,८८३ रूपये, छटाईवर २८,९६८ तर देखरेखीवर १२,२१२ असा ५५ हजार ६३ रूपयांचा खर्च केलेला आहे. तर वनपरिक्षेत्र कार्यालयातील खर्च कटाईवर ११,८२५ रूपये, छटाईवर ४३, ७३६ तर देखरेखीवर ११, ६४४ असा ६७ हजार २०५ रूपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. तर वृक्ष कटाईवर वाहतूक खर्च (गडेगांव लाकूड आगार) १४ हजार ४११ रूपये व ट्रॅक्टर भाड्यापोटी ९३ हजारांचा खर्च करण्यात आलेला आहे.लाकडी साहित्याची परस्पर विल्हेवाटपरवानगीविना वृक्षांची कटाई करण्यात आली. यासह कोका विश्रामगृहाच्या दुरूस्तीनंतर निघालेल्या लाकडी साहित्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. सदर प्रकार उघडकीस येऊन आठवडा लोटला असतानाही उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी याची साधी दखल घेतलेली नाही. उलट काही दिवसापूर्वीच वर्मा यांनी कामात कुचराईपणा केल्याचा ठपका ठेवत दोघांवर निलंबनाची कारवाई केली, हे विशेष. त्यामुळे यातील दोषींवरही कारवाईची अपेक्षा आहे.