बावनथडी धरणातून २० क्युबिक सोडले पाणी

By Admin | Updated: September 7, 2016 00:39 IST2016-09-07T00:39:15+5:302016-09-07T00:39:15+5:30

आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पातून महाराष्ट्र तथा मध्यप्रदेश शासनाने धान पिकाकरिता पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.

20 cubic water released from Bavanthadi dam | बावनथडी धरणातून २० क्युबिक सोडले पाणी

बावनथडी धरणातून २० क्युबिक सोडले पाणी

महाराष्ट्र तथा मध्य प्रदेश शासनाने सिंचनाकरिता सोडले पाणी : शेतीला पडल्या भेगा, शेतकरी डिझेल पंपाद्वारे करीत आहेत उपसा
मोहन भोयर तुमसर
आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पातून महाराष्ट्र तथा मध्यप्रदेश शासनाने धान पिकाकरिता पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या प्रकल्पात केवळ २८ टक्के पाणी साठा शिल्लक आहे.
महाराष्ट्र तथा मध्यप्रदेश शासनाचा संयुक्त बावनथडी (राजीव सागर) प्रकल्प आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. धानपिकाला पाण्याची सध्या गरज आहे. शेतात भेगा पडणे सुरु झाले आाहे. धान पिक वाचविण्याकरिता राज्य शासनाने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. तिच स्थिती मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे. मध्यप्रदेश शासनाने एकाचवेळी दि. २३ आॅगस्ट पासून प्रकल्पातून पाणी सोडणे सुरु केले.
तुमसर व मोहाडी तालुक्यातील सुमारे आठ हजार हेक्टर शेतीला याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ होईल असे जलसंपदा विभागाचे अभियंता यांनी लोकमतला सांगितले.
१५ आॅगस्टपर्यंत धरणात ३५ टक्के जलसाठा होता. तांत्रिक भाषेत हा मृत जलसाठा समजला जातो. आतापर्यंत २० घनमीटर प्रतीसेकंद पाण्याचा विसर्ग धरणातून करण्यात आला. पुढील आदेशापर्यंत पाणी येथे सोडण्यात येणार आहे.
खापा (तुमसर) परिसरातून बावनथडीचा मोठा कालवा जातो, परंतु लहान वितरिकेची कामे अपूर्ण असल्याने सुमारे ४०० एकर शेती सिंचनापासून वंचित आा६े. कालव्यात डिझेल पंप लावून येथील शेतकरी धानपिकांना पाणी देत आहे. याकरिता शेतकऱ्यांना डिझेलकरिता हजारो रुपये खर्च करावे लागत आहे.
येथील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. शेतीजवळून कालवा वाहते. परंतु आम्हाला पाणी मिळत नाही अशी खंत शेकडो शेतकऱ्यांनी व्यक्त केली. विहिर राहून तहानलेले अशी स्थिती येथे आहे.

बावनथडी धरणातून सिंचनाकरिता पाणी सोडण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. तुमसर तथा मोहाडी तालुक्यातील सुमारे ७ ते ८ हजार हेक्टर शेतीला पाणी मिळेल.
- आय. बी. राठोड,
उपविभागीय अभियंता, जलसंपदा विभाग, भंडारा

Web Title: 20 cubic water released from Bavanthadi dam