शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पात १८ टक्के जलसाठा

By admin | Updated: January 11, 2016 00:31 IST

जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस बरसला नाही. जिल्ह्यातील ४ मध्यम आणि ३१ लघु प्रकल्पांपैकी ५0 टक्के प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा नाही.

पावसाची टक्केवारी कमी : उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचे संकेतभंडारा : जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस बरसला नाही. जिल्ह्यातील ४ मध्यम आणि ३१ लघु प्रकल्पांपैकी ५0 टक्के प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा नाही. २८ जुने मालगुजारी तलावात २६.९५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जानेवारी महिन्याच्या दुसरा आठवड्यात जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पांत फक्त १८.१२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे. शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ ५५ टक्के पाण्याचा साठा आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांत १२.८८ जलसाठा होता. मात्र, पाऊस कमी पडल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जलसाठयात ०.७८ टक्क्यांनी घट झाली आहे. लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे.सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ८.४०१, बघेडा २२.८७४ टक्के जलसाठा आहे. बेटेकर बोथली व सोरणा जलाशयात जलसाठ्याची नोंद ० आहे. चारही मध्यम प्रकल्पात ८.९ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी चार मध्यम प्रकल्पात १० जानेवारीपर्यंत ८.०९ टक्के जलसाठा शिल्लक होता.जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २१.९६ टक्के आहे. माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा २६.९५ टक्के आहे. ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरमडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कातुर्ली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे. गोसेखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा असला तरी शहरातील नागरीकांना पाण्याची टंचाई भासत आहे. अनेक भागात नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळा संपण्याचा स्थितीत असतांनाही जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ २२.०६३ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी च्या तुलनेत यावर्षी पावसाची सरासरी कमी असल्याने उन्हाळ्यात पाण्याचे संकट बळावणार यात तिळमात्र शंका नाही. वैनगंगा नदीत भरपुर जलसाठा असला तरी नियोजन शून्य कारभारामुळे नागरिक पाण्यासाठी तरसणार आहेत. (प्रतिनिधी)