शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्ह्यातील १७०७ वॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:56 IST

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याच स्पर्धेत जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीचे १७०७ वॉर्ड सहभागी झाले असून १ आॅक्टोबरपासून सुरु झालेल्या या स्पर्धेची तपासणी अंतीम टप्प्यात आहे. यात उत्कृष्ट ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना आणि जिल्हा परिषद गटाना पुरस्कार दिले जाणार आहे.

ठळक मुद्दे५४१ ग्रामपंचायती : उत्कृष्ट ग्रामपंचायती व गटांना पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याच स्पर्धेत जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीचे १७०७ वॉर्ड सहभागी झाले असून १ आॅक्टोबरपासून सुरु झालेल्या या स्पर्धेची तपासणी अंतीम टप्प्यात आहे. यात उत्कृष्ट ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना आणि जिल्हा परिषद गटाना पुरस्कार दिले जाणार आहे.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची भंडारा जिल्ह्यात परिणामकारक अमलबजावणी सुरु आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत स्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अभियानात जिल्ह्यातील १७०७ वॉर्ड सहभागी झाले आहेत. त्यात भंडारा पंचायत समिती ३०८ वॉर्ड, मोहाडी २३७, तुमसर ३०९, लाखनी २२२, साकोली १९६, लाखांदूर १९५, पवनी २४० अशा वॉर्डाचा समावेश आहे.१ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात आले. यातून व्यापक प्रमाणात जनजागृती झाली. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता स्पर्धा सुरु झाली. गटविकास अधिकाºयांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक तपासणी समिती गठीत करण्यात आली. या समित्या आपला अहवाल नोव्हेंबर महिन्यात सादर करणार आहेत. त्यातील उत्कृष्ठ ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने गावात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली.उत्कृष्ट वॉर्डाला दहा हजाराचा पुरस्कारया स्पर्धेअंतर्गत उत्कृष्ठ ठरलेल्या वॉर्डांना रोख दहा हजार रुपये पुरस्कार देण्यात येईल. तसेच त्या वॉर्डातील कुटूंबांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. यानंतर जिल्ह्यातील सर्व जिल्हापरिषद गटातील ग्रामपंचातींसाठी स्पर्धा आयोजित करण्यात येईल. जिल्ह्यातील ५२ गटातून प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला ५० हजार रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे.