सेवालयास १.३५ लाखांची मदत

By Admin | Updated: May 5, 2017 00:39 IST2017-05-05T00:39:15+5:302017-05-05T00:39:15+5:30

येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे शाखा प्रबंधक सत्यनारायण चांडक यांनी सेवानिवृत्तीनिमित्त महाराष्ट्रात गाजलेला

1.35 lakhs help to the service | सेवालयास १.३५ लाखांची मदत

सेवालयास १.३५ लाखांची मदत

अनाथांसाठी पुढाकार : चांडक यांचा सेवानिवृत्तीनिमित्त उपक्रम
साकोली : येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे शाखा प्रबंधक सत्यनारायण चांडक यांनी सेवानिवृत्तीनिमित्त महाराष्ट्रात गाजलेला ‘हॅपी म्युझिक शो’ चा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी साकोलीकरांच्या मदतीतून १ लाख ३५ हजार रूपयांचा धनादेश खासदार नाना पटोले यांच्या हस्ते सेवालयाला सुपूर्द करण्यात आला. यावेळी नाना पटोले यांनी ३१ हजार रूपयांची मदत करून सेवालयासाठी हातभार लावला. होमिओपॅथीक अकादमी आॅफ रिसर्च अ‍ॅण्ड चॅरिटीजच्यावतीने हा कार्यक्रम साकोलीत पार पडला.
यावेळी अतिथी म्हणून खासदार नाना पटोले, नगराध्यक्षा धनवंता राऊत, पोलीस उपअधीक्षक एस.एस. कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी मोहनदास संखे, पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड, अशोक गुप्ता, नगरसेवक मनीष कापगते, मुंगुलमारे, वासनिक, शिवकुमार अग्रवाल, यावेळी हॅपी म्युझिक शो ची नृत्य दिग्दर्शिका स्नेहा शिंदे, प्रा शिंदे व मंदोदरी शिंदे उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यातील हसेगाव येथील सेवालय प्रकल्पातील ३५ एचआयव्हीबाधित विद्यार्थ्यांनी गणपती वंदना, गोंधळ, माऊली-माऊली, पिंगा, पोवाडा, लावणी, डोंबारी, कोळी गीते, आदिवासी गीते बालगीते आणि देशभक्तीपर गीतांवर नृत्य व कला सदर करून साकोली करांची मने जिंकली.
यावेळी सत्यनारायण चांडक यांनी साकोलीकरांनी दिलेले प्रेम आयुष्यभर विसरू शकणार नसल्याची भावना मनोगतातून व्यक्त केली. संचालन डॉ.आशा चांडक व ज्योतिबा बडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ.पवन चांडक, डॉ.आशा चांडक, प्रनिल नागुरे, वसंत मेश्राम, अश्विन राऊत यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 1.35 lakhs help to the service