शहापूर येथे ११ जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:24 IST2021-06-10T04:24:03+5:302021-06-10T04:24:03+5:30

भंडारा : तालुक्यातील शहापूर येथील शेतशिवारात जनावरांना आखूड दोराने निर्दयतापूर्वक बांधून ठेवलेल्या आणि चारापाण्याची व्यवस्था नसलेल्या ११ जनावरांची सुटका ...

11 animals released at Shahapur | शहापूर येथे ११ जनावरांची सुटका

शहापूर येथे ११ जनावरांची सुटका

भंडारा : तालुक्यातील शहापूर येथील शेतशिवारात जनावरांना आखूड दोराने निर्दयतापूर्वक बांधून ठेवलेल्या आणि चारापाण्याची व्यवस्था नसलेल्या ११ जनावरांची सुटका जवाहरनगर पोलिसांनी बुधवारी केली. या जनावरांची रवानगी सुकृत गौशाळेत करण्यात आली.

जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेतात ११ जनावरे निर्दयीपणे बांधून ठेवली असल्याची माहिती जवाहरनगरचे ठाणेदार पंकज बैसाने यांना मिळाली. त्यावरून त्यांनी पथक रवाना केले. त्या ठिकाणी एका शेतात ११ जनावरे एकमेकांना आखूड दोराने बांधून ठेवली असल्याचे दिसून आले. तसेच त्यांची कोणतीही चारापाण्याची व्यवस्था नव्हती. त्यावरून आरोपी बालू द्रुगकर (रा. शहापूर) याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व जनावरांची रवानगी पिंपळगावच्या सुकृत गौशाळेत करण्यात आली आहे.

Web Title: 11 animals released at Shahapur