शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित

By admin | Updated: October 16, 2014 23:20 IST

बावनथडी (राजीव सागर) सिंचन प्रकल्पातून उन्हाळ्यात दोन हजार हेक्टर तर इतर मोसमात १७ हजार हेक्टरपैकी केवळ ७ ते ८ हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळत आहे. प्रकल्पाची १५ ते २० टक्के

तुमसर : बावनथडी (राजीव सागर) सिंचन प्रकल्पातून उन्हाळ्यात दोन हजार हेक्टर तर इतर मोसमात १७ हजार हेक्टरपैकी केवळ ७ ते ८ हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळत आहे. प्रकल्पाची १५ ते २० टक्के कामे शिल्लक आहेत. संपूर्ण प्रकल्प (वितरिका) पूर्णत्वाकरिता ७० ते ८० कोटी निधीची गरज आहे. सध्या प्रकल्पात केवळ ५० टक्के जलसाठा आहे. या जलसाठ्यावर महाराष्ट्र व मध्यप्रदेशाचा सारखा हक्क आहे.बावनथडी प्रकल्प तुमसर तालुक्यातील सितेकसा गावाजवळ असून संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास येण्याकरिता वितरिका सह, जमीन हस्तांतरण, रेल्वे क्रॉसींगची कामे अपूर्ण आहेत. या संपूर्ण कामाकरिता ७० ते ८० कोटींचा निधी लागणार आहे. सन २०१५ च्या शेवटी या प्रकल्पाची संपूर्ण कामे पूर्ण होतील अशी माहिती आहे. या प्रकल्पातून सन २०१३-१४ मध्ये पाणी सोडण्यात आले होते. उन्हाळ्यात २० ते २५ गावांना सिंचनाचा लाभ झाला. सुमारे दोच्न हजार हेक्टर शेतीला पाणी पोहचले. येथे पुन्हा १५ ते २० टक्के वितरिकेची कामे शिल्लक आहेत. वितरिकेला जमीन मिळाली नाही. यात तुमसर, राजापूर, बोरी, कारली, देव्हाडी, चारगाव, ढोरवाडा, सुकळी, मांढळ, उमरवाडा, नवरगाव, माडगी, बाम्हणी, मांगलीसह काही गावात वितरिकेची कामेच झाली नाही.रेल्वे क्रॉसिंगला मंजुरी मिळाली नाही. जमीन हस्तांतरणाची कामे झाली नाही. सन २०१५ पर्यंत ही कामे होतील अशी माहिती आहे. जमीन हस्तांतरणाकरिता १२ ते १३ कोटी निधीची गरज आहे.शेतकऱ्यांना येथे टप्प्याटप्प्याने धरणातून पाणी सोडले जात आहे. २५ टक्केच पाणीसाठा महाराष्ट्राच्या वाट्याला आल्याने पाण्याची बचत व योग्य विनियोग कसे करता येईल याचा आराखडा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गेडाम यांनी तयार केला आहे. प्रकल्पाचा मुख्य कालवा २६ कि.मी. लांबीचा आहे. त्यानंतर दोन लघु कालवे दोन दिशेने जातात. यापूर्वी दोन्ही लघु कालव्यातून पाणी सोडले जात होते. त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत होता.सध्या एक लघु कालवा सहा दिवस सुरु राहील. तर दुसरा लघुकालवा त्यानंतर सुरु राहील. असे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.अनेक ठिकाणी कालवे फुटली असून त्यांना भगदाड पडले आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कालव्यांना पाण्याकरिता भगदाड पडले आहेत.सध्या वितरीकेची कामे बंद असून आॅक्टोबरनंतर ती सुरु होणार असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)