शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

लागवडीखालील १० टक्के क्षेत्र पडित

By admin | Updated: September 23, 2016 00:36 IST

जिल्ह्यात धान्य लागवडीखालील येणाऱ्या क्षेत्रापैकी जवळपास १० टक्के क्षेत्र पडित राहण्याची चिन्हे आहेत.

धानाचे क्षेत्र सहा टक्के : पावसाचा फटका, बळीराजा पुन्हा संकटातभंडारा : जिल्ह्यात धान्य लागवडीखालील येणाऱ्या क्षेत्रापैकी जवळपास १० टक्के क्षेत्र पडित राहण्याची चिन्हे आहेत. यात धानपिकाखालील क्षेत्राची टक्केवारी सहा इतकी आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीवर नजर घातल्यास उत्पादनात घट होणार काय, अशी चिंताही सतावू लागली आहे. परिणामी बळीराजा पुन्हा सुलतानी संकटात सापडणार आहे. जिल्ह्यात यावर्षी चालू खरीप हंगामात एकूण दोन लक्ष नऊ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रात लागवडीखालील क्षेत्राअंतर्गत विविध धान्य पिकांची लागवड करण्याचे उद्दीष्ट होते. यापैकी एक लक्ष ८७ हजार ६४३ हेक्टर क्षेत्रात पिकांची पेरणी करण्यात आली. एकूण लागवडीखालील सर्वसाधारण क्षेत्रापैकी पेरणी झालेल्या क्षेत्राची टक्केवारी ८९.५६ इतकी आहे. त्यामुळे ढोबळ मानाने लागवडीखालील क्षेत्र पडित राहण्याची चिन्हे आहे. यावर्षी भातपिकाच्या सर्वसाधारण एक लक्ष ८२ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रापैकी एक लक्ष ७२ हजार ५१५ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली. याची टक्केवारी ९४.३९ टक्के इतकी आहे. तसेच एकूण कडधान्याचे पेरणीक्षेत्र ११ हजार ३७८ इतकी आहे. याची टक्केवारी ९३.१७ इतकी आहे. एकूण तेलबिया पिकाचे पेरणी क्षेत्र १२०९ हेक्टर एवढे असून त्याची टक्केवारी १५.५३ आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात पिकाची लागवड करण्यात येत असली तरी बेभरोशाच्या पावसावर बळीराजाची साद असते. पावसाच्या लहरीपणामुळे हंगामाच्या सुरूवातीलाच पाऊस बरसला नाही. जुलै महिन्यात मुसळधार पावसाला सुरूवात होताच सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीसह रोवणी कामालाही सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने काही तालुक्यांमध्ये रोवणीची कामे खोळंबली होती. १५ दिवसांपूर्वी वरूणराजाने हजेरी लावताच खोळंबलेली रोवणी करण्यात आली असली तरी जिथे पाऊस बरसला नाही तिथे मात्र अजुनही रोवणी खोळंबलेली असून पऱ्हे पिवळे पडले आहेत. अस्मानी संकटाचा फटका बळीराजाच्या मानगुटीवर बसला आहे. या आठवड्याच्या सुरूवातीला पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी हलक्या धानाला याचा फायदा होणार आहे. मात्र भारी धानाला पुन्हा पावसाची प्रतिक्षा राहणार आहे. (प्रतिनिधी)