शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या प्रचाराला मिळणार १० दिवस

By admin | Updated: October 6, 2015 00:44 IST

नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच संंबंधित क्षेत्रातील हवसे, गवसे अन नवसे कामाला लागले असून ...

निवडणूक नगरपंचायतीची : अर्ज भरण्यासाठी अनेक दावेदार सरसावलेसाकोली : नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच संंबंधित क्षेत्रातील हवसे, गवसे अन नवसे कामाला लागले असून उमेदवारांना प्रचारासाठी केवळ १० दिवसांचा कालावधी मिळणार आहे. नगर पंचायतीमधील प्रभागाचे क्षेत्र पाहता वातावरण उत्साही दिसत आहे. साकोली नगर पंचायतीची निवडणूक प्रक्रीया सुरू झाली आहे. १ ते ८ आॅक्टोबरपर्यंत नामनिर्देशपत्र स्वीकारले जाणार आहे. ९ आॅक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छानणी करून त्याचदिवशी वैद्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख १९ आॅक्टोबर असून २० आॅक्टोबरला निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून चिन्हाचे वाटप केले जाईल. नगर पंचयतीसाठी १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय सेंदुरवाफा येथे होईल.नगर पंचायतीच्या निर्मितीबाबत मागील वर्षभरापासून शासनस्तरावर कार्यवाही सुरू होती. यावर्षीच्या सुरवातीला ही नगर पंचायत अस्तित्वात आली. तेव्हापासून इच्छुक उमेदवारांची अनेक दिवसापासून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आता प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने गावामध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)उमेदवारीसाठी भाऊगर्दीसध्या नामांकन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी आहेच. मात्र आपल्याच पक्षाची तिकिट मिळावी यासाठी पक्षाचे जेष्ठ नेत्याकडे उमेदवारांची सकाळपासूनच गर्दी दिसून येत आहे तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी व्हॉट्सअपचा उपयोगही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.बंडखोरीची शक्यतानगर पंचायतीची निवडणूक ही पहिलीच निवडणूक असल्याने अनेकांना उत्साह आहे. प्रत्येकाला वाटते की तिकीट आपल्यालाच मिळावी यासाठी सर्वाेतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र तिकीट एकालाच मिळणार त्यामुळे बरेचजन बंडखोरीच्या तयारीत असून अपक्ष लढण्याच्याही तयारीत आहेत. माजी सरपंच खुशाल हुकरे हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला व राजकारणातून संन्यास घेतला होता. आता पुन्हा आपल्याच वॉर्डातून अपक्ष लढण्याची तयारी करीत आहेत.