शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गुरु प्रदोष २०२६: महादेवांचे व्रत अवश्य करा; पाहा, शिव पूजनाचा सोपा विधी अन् प्रभावी मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 13:55 IST

Guru Pradosh Vrat May 2026: वैशाख महिन्याची सांगता होत असताना प्रदोष व्रत आहे. या दिवशी महादेवांसह गुरू सेवा अवश्य करावी, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या...

Guru Pradosh Vrat May 2026: मराठी वर्षातील वैशाख महिना सुरू असून, आता या महिन्याची सांगता होत आहे. यानंतर १७ मे २०२६ पासून अधिक मास सुरू होत आहे. अधिक मास हा अतिशय शुभ पुण्य फलदायी मानला जातो. तत्पूर्वी, गुरुवारी प्रदोष व्रत आहे. वैशाख महिन्यातील प्रदोष व्रतात करायचे शिव पूजन, शिव मंत्र याबाबत जाणून घेऊया...

प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी गुरुवारी येते, तेव्हा त्याला गुरु प्रदोष व्रत असे म्हटले जाते. तसेच गुरु प्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होण्यासाठी तसेच गुरुबळ, गुरुकृपा लाभण्यासाठी गुरु ग्रहाच्या संदर्भात मंत्रांचे जप, उपासना, दान करावे, असे सांगितले जाते. वैशाख महिन्यातील गुरू प्रदोष व्रत गुरुवार, १४ मे २०२६ रोजी आहे. 

गुरू प्रदोष महादेवांचे व्रत अवश्य करा

गुरू प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला, दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. तत्पूर्वी, सकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात.

१०८ बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करा

महादेवांची षोडषोपचार पद्धतीने पूजा करावी. षोडषोपचार पद्धतीने पूजा करणे शक्य नसेल, तर पंचोपचार पद्धतीने पूजन करावे. आपापले कुळधर्म आणि कुळाचार, परंपरा पाळून पूजन करावे. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे. शक्य असल्यास व्रत पूजनात १०८ बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत, असे म्हटले जाते.

प्रभावी मंत्रांचा यथाशक्ती जप करावा

गुरू प्रदोष व्रत काळात महादेव शिवशंकरांच्या प्रभावी मंत्रांचे जप करणे लाभदायक ठरू शकते, असे म्हटले जाते. 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. 

गुरू सेवा करायचा विसरू नका

गुरुवार या दिवसावर गुरु ग्रहाचा अंमल असतो. नवग्रहांमध्ये बृहस्पति म्हणजे गुरु ग्रह देवांचा गुरु मानला गेला आहे. गुरु प्रदोषच्या दिवशी महादेव, दत्तगुरुंसह गुरु ग्रहाची उपासने केल्यास कुंडलीतील स्थान मजबूत होणे, गुरुबळ मिळणे, गुरु ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यास मदत होणे असे अनेक लाभ होऊ शकतात, असे सांगितले जाते. गुरुप्रदोषाच्या दिवशी महादेवांसोबत गुरुदेवांचे स्मरण करावे. गुरुचा मंत्र किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती म्हणावा. देवानांच ऋषीणांच गुरुं कान्चनसन्निभम। बुद्धि भूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पितम्॥, हा नवग्रह स्तोत्रातील गुरुचा मंत्र आहे. कुंडलीतील गुरुची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर गुरुवारी विशेष व्रत करावे. गुरुशी संबंधित वस्तू, पिवळ्या वस्तूंचे यथाशक्ती दान करावे, असे म्हटले जाते.

॥ ॐ नमः शिवाय ॥

॥ हर हर महादेव ॥

 

English
हिंदी सारांश
Web Title : Guru Pradosh 2026: Observe Shiva Vrat, Puja Vidhi, Mantras

Web Summary : Observe Guru Pradosh Vrat on May 14, 2026, dedicated to Lord Shiva. Perform Shiva puja during the Pradosh period, chant 'Om Namah Shivaya', offer Bilva leaves, and recite Shiva mantras for blessings and spiritual growth. Donate yellow items.
टॅग्स :Pradosh Vratप्रदोष व्रतPuja Vidhiपूजा विधीLord Shivaमहादेवshree datta guruदत्तगुरुspiritualअध्यात्मिकIndian Festivalsभारतीय उत्सव-सण