Tarot Card: दिवाळीपूर्व आठवडा उत्साहाचा, आनंदाचा, वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 11:15 IST2025-10-11T11:13:03+5:302025-10-11T11:15:43+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी किंवा राशिनुसार तुम्हाला तुमचे साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेता येईल.

Tarot Card: दिवाळीपूर्व आठवडा उत्साहाचा, आनंदाचा, वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
१२ ते १८ ऑक्टोबर
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
नंबर १: (राशी मेष/कर्क/तूळ/मकर)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी एका कलाटणीचा असणार आहे. महत्त्वाचे बदल घडतील. हे बदल तुमच्या मनाप्रमाणे नसतील आणि तुम्हाला शरणागती पत्करावी लागेल. अपेक्षित ध्येय गाठण्यात अजून वेळ आणि कष्ट लागतील. पण असं असूनही घाबरु नका, हे बदल सुधारणा करण्यासाठी गरजेचे आहेत. "बदल हा निसर्गाचा नियम आहे" हे विसरू नका!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही स्वतःचा अहंकार, गर्व आणि मोठेपणा बाजूला ठेवून वागण्याची गरज आहे. आलेल्या परिस्थितीशी झगडायला जाऊ नका, शांतपणे स्वीकार करा. मागे झालेल्या वाईट घटना विसरण्याचा प्रयत्न करा. अंधार झाल्यानंतरच नाव सूर्योदय होतो आणि अंधारात आपल्याला सोबत करायला एखादी तरी चांदणी नेहमी असते हे लक्षात ठेवा!
नंबर २: (राशी वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी आनंदाचा आणि समाधानाचा असणार आहे. एखादा प्रमुख टप्पा गाठला जाईल. त्यामुळे तुम्हाला आतून उत्साह वाटेल. एखादा कार्यक्रम ठरेल. एखादा सण साजरा केल्यासारखा आनंद होईल. सगळ्यांची साथ मिळेल. एक चांगले निष्पन्न निघेल. केलेल्या कष्टाचं चीज होईल. पुढची वाट मोकळी होईल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या परिश्रमाचे चांगले परिणाम अनुभवणार आहात. त्यासाठी तुम्ही थोडी सवड काढण्याची गरज आहे. तुम्हाला ज्यांनी आत्तापर्यंत साथ दिली त्यांच्याबद्दल कृतज्ञ रहा. आत्ता पाया मजबूत करुन पुढचे नियोजन करण्याची तयारी सुरु करा. "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" असे वागा!
नंबर ३: (राशी मिथुन/कन्या/धनू/मीन)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन उमेद घेऊन येत आहे. मागचं विसरून नवीन सुरुवात करण्यासाठी तयार रहा. एक प्रसन्न आणि उत्साहवर्धक घटना घडू शकते. चांगला सकारात्मक बदल घडू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन संकल्पना सुचतील. तुमच्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल पुढे जाल. "आजचा दिवस माझा" असा काळ आहे!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही नवीन काहीतरी सुरू करायचं आहे. तुमच्या मनात सुरू असलेले विचार आणि कल्पना लोकांपर्यंत पोचवा. मोकळेपणाने व्यक्त व्हा. सृजनशीलता बाळगा, वेगळ्या पद्धतीने काम करा. बदल घडत असतील तर ते स्वीकारा. गर्व न करता स्वतःचं केलेलं काम इतरांना दाखवा. आळस सोडलात तर उन्नती होईलच!
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.