Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:32 IST2025-08-11T12:31:22+5:302025-08-11T12:32:15+5:30
Shivlinga Abhishek Rules: शिवलिंगावर अभिषेक हा केवळ महादेवाचा नाही तर समस्त शिवपरिवाराचा असतो, तो करताना दिलेली चूक टाळा तरच मिळेल यथोचित फळ!

Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
आज तिसरा श्रावणी सोमवार(Shravani Somvar 2025), त्यानिमित्त महादेवाची पूजा करण्यासाठी शिव मंदिरात जाणे होईल. महादेवाला बेल, पांढरी फुले, दूध साखरेचा नैवेद्य दिला जाईल. त्याबरोबरच दूध-पाण्याचा अभिषेक केला जाईल. मात्र या अभिषेकाच्या वेळी आपल्याकडून एक चूक केली जाते, ती कोणती आणि कशी टाळायला हवी ते जाणून घ्या.
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
शिवलिंगावर अभिषेक हा केवळ महादेवाला नाही तर समस्त शिवपरिवाराला असतो. त्यामुळे तो करताना कसा करावा त्याची योग्य पद्धत जाणून घेऊ.
>> शिवलिंगाच्या उजव्या भागावर गणपती विराजन असतात, त्यावर अभिषेक करत सुरुवात करावी आणि 'श्री गणेशाय नमः' म्हणत गणेशाचे स्मरण करावे.
>> शिवलिंगाच्या डाव्या भागावर कार्तिकेय विराजमान असतात, त्यावर अभिषेक करत 'श्री स्कंदाय नमः' स्मरण करावे.
>> मध्यभागी विराजित असते बाल त्रिपुर सुंदरी, त्यावर अभिषेक करत 'श्री त्रिपुर देव्यै नमः' हा नामजप करावा.
>> शिवलिंगाचा पाया अर्थात पिंडीभोवतीचा भाग देवी पार्वतीचा असल्याने त्यावर उजव्या बाजून चक्राकार अभिषेक करत 'श्री जगदंबिकायै नमः' जप करावा.
>> सर्वात शेवटी शिवलिंगाच्या मध्यावर/माथ्यावर संतत धार ठेवून 'ओम नमः शिवाय' म्हणत महादेवाचा जप करावा.
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
अशा पद्धतीने केलेला शिव अभिषेक तुमची पूजा पूर्णत्त्वास नेईल. त्यामुळे यापुढे शिव अभिषेक करताना तो एकट्या महादेवाला नाही तर शिवपरिवाराला करत आहात हे लक्षात ठेवा.