शनी देव हे नाव काढले की अनेकांच्या मनात भीती दाटते, पण खरं तर ते न्यायाचे आणि कर्माचे फळ देणारे दैवत आहेत. कर्माचा हिशोब ठेवणारी ही देवता कधी कोणावर अन्याय करत नाही. जसा आपण सीसीटीव्ही कॅमेरा असताना चोरी करत नाही, तसाच आपला आचार आणि विचार शुद्ध असेल तर शनी देवाच्या कोपाची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही.
हे ही वाचा : शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!
येत्या शनी जयंती निमित्त जर तुम्ही शनी मंदिरात दर्शनाला जाणार असाल, तर आपल्याकडून नकळत काही चुका होऊ नयेत यासाठी शास्त्रोक्त पद्धत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दर्शनावेळी टाळाव्यात अशा ४ महत्त्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत.
१. देवाच्या डोळ्यात पाहू नका
शनी देव हे सूर्यपुत्र आहेत आणि त्यांच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे. ज्याप्रमाणे आपण सूर्याकडे थेट पाहू शकत नाही, तसेच शनी देवाच्या डोळ्यातील प्रखर तेज आपल्याला मानवणार नाही. पूजा करताना नेहमी आपले डोळे बंद ठेवा किंवा देवाच्या पायांकडे पाहून प्रार्थना करा. हे नम्रतेचे लक्षण असून यामुळे आपण त्यांच्या शक्तीचा सन्मान राखतो.
२. पाठ दाखवू नका (Respectful Exit)
देवदर्शन घेतल्यावर आपण सहसा देवाला पाठ दाखवत नाही, हाच नियम शनी मंदिरात अधिक काटेकोरपणे पाळला जातो. दर्शन झाल्यावर मंदिराबाहेर पडताना देवाकडे बघतच (मागे वळू नका) हळूहळू बाहेर पडा. मराठीत 'पाठ दाखवणे' म्हणजे दुर्लक्ष करणे किंवा मदत नाकारणे असा अर्थ होतो. आपण देवाला पाठ दाखवली नाही, तर संकटकाळी तोही आपल्याला पाठ दाखवणार नाही, अशी श्रद्धा आहे.
हे ही वाचा : Adhik Maas 2026: अधिक मासात संकटमुक्तीसाठी करा 'ही' दत्तसेवा; मिळेल श्री दत्तगुरूंचा अखंड आशीर्वाद!
३. लोखंडी भांड्यातून तेल अर्पण करा
शनी देवाला मोहरीचे तेल अत्यंत प्रिय आहे. मात्र, ते अर्पण करताना भांड्याचा धातू कोणता आहे हे तपासणे महत्त्वाचे ठरते. लोखंड हा शनी देवाचा आवडता धातू आहे. म्हणूनच, लोखंडी भांड्यातून (पळी किंवा वाटी) तेल अर्पण केल्यास शनी देव अधिक प्रसन्न होतात, असे शास्त्रकार सुचवतात.
४. पूजेसाठी योग्य दिशा निवडा
बहुतेक देवांची पूजा आपण पूर्व दिशेला तोंड करून करतो, पण शनी देवाच्या बाबतीत नियम वेगळा आहे. शनी देव हे पश्चिम दिशेचे स्वामी मानले जातात. त्यामुळे त्यांची उपासना किंवा पूजा करताना आपले तोंड पश्चिम दिशेला असणे शुभ आणि अधिक फलदायी मानले जाते.
हे ही वाचा : Gomed Gemstone: राजकारणात किंवा व्यवसायात हवे मोठे पद? 'गोमेद' रत्न पालटू शकते भाग्य!
शनी देव कर्माचा न्याय करतात, त्यामुळे आपले कर्म आणि नियत स्वच्छ असेल तर त्यांचे आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतील.
Web Summary : Visiting Shani temple? Avoid looking at the idol's eyes, and offer oil in iron vessels facing west. Respectful exit is key; don't turn your back. Pure intentions bring blessings.
Web Summary : शनि मंदिर जा रहे हैं? मूर्ति की आँखों में देखने से बचें, पश्चिम की ओर मुख करके लोहे के बर्तन में तेल चढ़ाएं। सम्मानपूर्वक बाहर निकलें; अपनी पीठ न दिखाएं। शुद्ध इरादे आशीर्वाद लाते हैं।