नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 15:26 IST2025-09-24T15:23:32+5:302025-09-24T15:26:07+5:30

Navratri 2025: कोकणातले निसर्ग वैभव अनुभवण्यासाठी आणि पंचमुखी गायत्री देवीच्या दर्शनासाठी एकदा इथे जायलाच हवे; सविस्तर माहिती वाचा. 

Navratri 2025: Have you seen the 125-year-old Panchamukhi Gayatri Temple in Konkan? Mesmerizing idols and history | नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 

नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 

सध्या सोशल मीडिया नवरात्रीच्या रंगात रंगून गेला आहे. देवीचे विलोभनीय रूप विविध माध्यमातून बघायला मिळत आहे. ऋषी देसाई यांची अशीच एक पोस्ट पाहण्यात आली आणि त्यातील पंचमुखी गायत्री देवीच्या मूर्तीने लक्ष वेधून घेतले. संतसाहित्य या संकेत स्थळावरदेखील या मंदिराबद्दल माहिती सापडते. कोकणाचे आकार्षण प्रत्येकाला असतेच, या मंदिराच्या निमित्ताने आणखी एक स्थान तुमच्या भ्रमंती यादीत समाविष्ट करून घ्या. 

नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!

अत्यंत दुर्मिळ अशा पंचमुखी श्रीगायत्रीदेवीचे हे सुंदर रुप महाडजवळ माणगावच्या पुढे गोरेगाव येथील मंदिरात आढळते. ज्याचे नाव आहे 'महाड गोरेगावची पंचवदनी आदिशक्ती गायत्री माता!' या मंदिराची माहिती आणि इतिहास जाणून घेऊ.  

कोकणातील हे मंदिर इतर ग्रामदैवतांपेक्षाही फार वेगळे आहे. अमृतेश्वरी, आदिशक्ती, गायत्री सूर्योपसोनेतील आद्यदेवता समजली जाणारी पंचवदना गायत्री माता. दशभूजा स्वरुपातील मूर्ती सुमारे सव्वाशे वर्ष जूनी असल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्रात मोजक्याच असलेल्या गायत्री देवीच्या या मंदिरातील कोकणातील रायगडमधील महाड गोरेगावचे हे मंदिर आहे. 

खरंतर या गावात अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. ८०० वर्षापूर्वीचे मल्लिकार्जुन हे देउळ गावची शानच आहे.हे देउळ डोंगरावर आहे, पण लोक श्रध्देने तिथे जातात. तिथे गणपतीचे एकमेव असे देउळ आहे, ज्याचा वरचा भाग पुरूषाचा आणि खालचा भाग बाईचा आहे. वरदेश्वरच्या देवळात उभा नंदी आहे. इथले विठ्ठलाचे मंदिर ३०० वर्षापूर्वीचे आहे. तेथील शंकराचा बाण पेशवे कालीन आहे. 

Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न

अनेक पुराणकालिन मंदिराचा वैभवशाली वारसा मिरवणाऱ्या या गावातील हे गायत्री मातेचे मंदिर. जागृत गायत्रीचे मंदिर आणि त्या देवळाच्यासमोर पोळ ह्या रत्नाचा वीतभर गणपती आहे. ह्या देवीची स्थापना कै.लक्ष्मणशास्त्री सदाशिव रानडे ह्यांनी शुक्ल वैशाख शुद्ध सप्तमी १९०४ रोजी केली. त्या दिवशी गंगा आवाहन व पुजन केले.  ही मुर्ती जयपूरहून आणली होती. 

मूर्तीचे स्वरूप : 

देवीची मुर्ती पंचमुखी व दशभुजांची आहे तीने उजवा पाय खाली सोडून कमळावर बसली आहे. ती पूर्वाभिमुख आहे. मधले मुख गायत्रीदेवीचे आहे. उजवीकडील पहिले मुख गणपतीचे आहे. त्याचा रंग केशरी असुन  हातात पाश व अंकुश धारण केले आहे. उजवीकडील दुसरे मुख श्रीसुर्यनारायणाचे आहे. मोत्याचा रंग असलेले हे मुख एका हाताने अभय आणि दुसऱ्या हाताने आशीर्वाद देत आहे. गायत्रीच्या डावीकडील पहिले मुख यमपाशी आहे. त्याचा रंग सोनेरी निळा आहे, यमपाशी असल्यामुळे आशीर्वचन करताना हातात लगाम व शुभ्रकपाल आहे.डावीकडील दुसरे मुख श्रीविष्णुचे आहे ते शुभ्र पांढऱ्या रंगाचे आहे. त्यांनी हातात चक्र धारण केलेले आहे. या सगळ्याचे वर्णन पुरोणोक्त समजून घेणे आवश्यक आहे. ह्या मंदिरात इतर देवांची "यंत्र" आहेत. ती शक्तीची स्रोत आहेत. स्थानिकांकडून माहिती घेतल्यास या मूर्तीचे रूप स्पष्टपणे कळते. 

सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

त्यासाठी गायत्री म्हणजे काय ते पाहू 

गायत्री देवी आदीशक्तिच्या प्रकृतीच्या पाच स्वरुपातील एक मानली जाते. गायत्री मातेलाच वेदमाता असेही म्हणण्यात येते. पुराणोक्त अभ्यास केल्यास एक जाणवेल की गायत्री देवी म्हण नित्यसिद्ध असे परमेश्वराचे रुप आहे. गायत्री देवी म्हणजे ख-या अर्थाने ज्ञान आणि विज्ञानाची तेजोमय मूर्ती आहे. याच कारणास्तव कदाचित परब्रम्हस्वरुपिणी असे देखील शक्तीच्या या रुपाला संबोधले जाते. 

गायत्री हा शब्द म्हटला की सूर्यगायत्री मंत्र नजरेसमोर येतो, पण असे असले तरी या देवतेची तिन्ही त्रिकाळ पुजा करण्यात येते. सकाळच्या वेळी गायत्री माता ही सूर्यमंडलाच्या मध्य़भागी विराजमान असते. त्यावेळी गायत्री देवीने अक्षसूत्र आणि कमडंलू धारण केलेले दिसते. देवीचे हे रुप ब्रम्हशक्ती गायत्री नावाने प्रसिद्ध आहे. तर मध्यान्हकाळी देवीचे स्वरुपा युवामय असते. चार हाथ आणि तीन नेत्र असलेली गायत्री माता ही वैष्णवी देवानी ओळखली जाते. शंख, चक्र, गदा, आणि कमळ आभूषित देवीचे हे रुप प्रेरणादायी असते. याच रुपाला काही ठिकाणी सावित्री नावानेही ओळखले जाते. संध्याकाळच्या वेळेस गायत्री मातेचे रुप हे पुर्णत्वाच्या समीप असते. या अवतारात त्रिशूल, डमरु, पाश आणि पात्र धारण केलेले देवीचे हे रुप म्हणजे रुद्र शक्तीचे प्रतिक मानले जाते. 

गायत्री देवी ही ख-या अर्थाने दैहिक, दैविक आणि भौतिक अशा तीन रुपातील विद्यास्वरुप शक्तीचे एक अनोखं रुप आहे. देवी गायत्रीची अनेक रुप आहेत. पण महाड – गोरेगावच्या या पंचवदनी गायत्री मंदिराच्या निमित्ताने वर लिहीलेली गायत्री माता महिमा समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आता प्रश्न पडतो की पंचवदनी किंवा पंचमुखी गायत्री मातेच्या रुपाचे निरुपण कसे होईल. पण शारदातिलकचा संदर्भ तपासला तर भगवान गायत्रीचे या मंदिरातील रुप हे यथार्थ आहे. पाच मुख असलेली, हास्य विलसित असलेली या दैवताकडे पाहत बसलं ना चांदण आभाळभर विखुरत, सूर्य किरणांचा साज भुईभर सांडतो आणि आत्मतत्वाचे असलेले निर्गूणपण स्वत:च्या देहात येते. 

गायत्री देवीचे हे मंदिर कोकणात असलं तरी लौकिकार्थाने पारंपारिक मंदिर नाही. मुंबई गोवा महामार्गावर रायगडमधल्या महाडजवळच्या गोरेगावमधल्या या मंदिराला एकदा भेट द्या. 

English summary :
Explore Kokan's ancient Panchmukhi Gayatri Temple, a unique spiritual site near Mahad-Goregaon. This 125-year-old temple features a rare five-faced Gayatri idol. The temple, established in 1904, is a must-visit destination showcasing the goddess's unique form and regional heritage.

Web Title: Navratri 2025: Have you seen the 125-year-old Panchamukhi Gayatri Temple in Konkan? Mesmerizing idols and history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.