शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

Navratri 2024: नवरात्रोत्सवात अंबाबाईच्या विविध रूपांचे होणार दर्शन; घटस्थापनेपासून भाविकांची अलोट गर्दी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 15:50 IST

Navratri 2024: यंदा कोल्हापूरची अंबाबाई दिसणार देवीच्याच सुंदर नऊ रूपांत; कधी कोणते रूप बघायला मिळणार ते जाणून घ्या. 

कोल्हापूर : सिंहासनारूढ श्री अंबाबाई, गजेंद्रलक्ष्मी, चंद्रलांबा परमेश्वरी, महाप्रत्यांगीरा अशा दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांचे दर्शन करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या माध्यमातून लाखो भाविकांना होणार आहे. श्री अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या वतीने देवीच्या या रूपांची जय्यत पूर्वतयारी करण्यात आली आहे.

शारदीय नवरात्रोत्सवात रोज श्री अंबाबाईची दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांतील मनोहारी पूजा बांधली जाते. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात देवीची अशा पद्धतीने पूजा बांधली जात असणारे हे एकमेव मंदिर असावे. त्यामुळेच जगभरातील भाविक देवीच्या या रूपांचे दर्शन घेण्यासाठी आतुर असतात. दुपारच्या आरतीनंतर ही पूजा बांधली जाते.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

मंदिरात रोज सकाळी सहा ते सात या वेळेत संगीता रेवणकर यांचे ललितसहस्रनाम तसेच सकाळी सात ते आठ या वेळेत जगदीश गुळवणी यांचे श्रीसूक्त पठण होणार आहे. त्यानंतर रात्री साडेआठ वाजेपर्यंत कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांतील भजनी मंडळे, सांस्कृतिक संस्थांच्या वतीने कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे.

नवरात्रोत्सवात अंबाबाईची विविध रूपे अशी

गुरुवार (दि. ३) : सिंहासनारूढ अंबाबाईशुक्रवार (दि. ४) : गजेंद्रलक्ष्मीशनिवार (दि. ५) : चंद्रलांबा परमेश्वरीरविवार (दि. ६) : गायत्री मातासोमवार (दि. ७) : सरस्वतीदेवीमंगळवार (दि. ८) : गजारूढ अंबारीतील पूजाबुधवार (दि. ९) : महाप्रत्यांगीरागुरुवार (दि. १०) : दुर्गामाताशुक्रवार (दि. ११) : महिषासुरमर्दिनीशनिवार (दि. १२) : रथारूढ

टॅग्स :Navratri Mahotsav 2024शारदीय नवरात्रोत्सव २०२४Navratriनवरात्रीkolhapurकोल्हापूरTempleमंदिर