शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2021 : साधकाला अष्टसिद्धी देणारी देवी अशी जिची ओळख आहे ती माता सिध्दीदात्री !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 22:02 IST

Navratri 2021 : सिद्धिदात्री हा शब्द सिद्धि आणि दात्री या दोन शब्दापासून बनला आहे, म्हणजेच सर्व अलौकिक शक्ति प्रदान करणारी देवी, जी शक्ति साधकाला पूर्ण ज्ञान प्रदान करून हृदयात संपूर्ण आनंद आणि प्प्रसन्नता जागृत करते.

>> आचार्य विदुला शेंडे

नवरात्रीचा नववा दिवस म्हणजेच अश्विन शुद्ध नवमी , विश्वाच्या सुरूवातीला शिवाने शक्तीची उपासना केली, की जिला आकार नव्हता, निर्गुण स्वरुपात होती अशी ही आदिशक्ती शिवशक्ती सिद्धीदात्री रूपात व्यक्त झाली असे म्हटले जाते.  केतू या ग्रहाला दिशा देण्याचे काम या शक्तीने केले. 

चतुर्भुज स्वरुपात प्रकट झालेल्या हिच्या एका हातात गदा, दुसर्‍या हातात चक्र, तिसर्‍या हातात कमळ व चौथ्या हातात शंख आहे. भगवान शंकराने तप करून या शक्तीला प्रसन्न केले म्हणून शंकराला अर्ध नारी नटेश्वर नाव प्राप्त झाले, ही सिद्धीदत्री कमलासनावर विराजमान आहे. आणि हिचे वाहन सिंह आहे.

या शक्तीच्या साधनेने साधकास अष्टसिद्धी (मार्कंडेय पुराण) व अठरा सिद्धि (ब्रह्मावर्त पुराण) प्रमाणे सिद्ध होतात. लौकिक व अलौकिक सिद्धि प्राप्त होताना व्यक्तिस कोणतीही इच्छा व आकांक्षा राहात नाही. या शक्तीच्या साधनेत व्यक्ति सर्व सुख प्राप्त करून संसार चक्रापासून अलिप्त होतो.

सिद्धिदात्री हा शब्द सिद्धि आणि दात्री या दोन शब्दापासून बनला आहे, म्हणजेच सर्व अलौकिक शक्ति प्रदान करणारी देवी, जी शक्ति साधकाला पूर्ण ज्ञान प्रदान करून हृदयात संपूर्ण आनंद आणि प्प्रसन्नता जागृत करते. भक्तामधील विकार, कमतरता, वेदना दूर करण्याचे मार्ग ही शक्ति दाखविते.

ही शक्ति प्रत्येकाच्या कर्माला फल प्रदान करते, साधकाला अलौकिक सिद्धि दिल्यावर त्याची जबाबदारी लोक कल्याणसाठी कशी करावी याचेही ज्ञान प्रदान करते. प्राप्त झालेल्या सिदधींचा गर्व न करिता परम तत्वाकडे कसे जावे याचेही ज्ञान देते. या शक्तिनेचे सरसाती,पार्वती आणि लक्ष्मि ही रुपे प्रकट केली की ज्या ब्रह्मा , विष्णु आणि महेश यांच्या कार्यात मदत करतील.

या शक्तीचे स्थान हे सहत्रार चक्राच्या वर निर्वाण चक्रमध्ये आहे, जे धारणा, ध्यान व सविकल्प समाधी प्रदान करते. शून्य स्थिति, शांतता व आनंद ही शक्ति प्रदान करते.

या देवी सर्व भुतेषू सिद्धि दात्री रूपेण संस्थिता नमः स्त्स्येही  नमः स्त्स्येही नमः स्त्स्येही  नमो नमः |

टॅग्स :Navratriनवरात्री