शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संत एकनाथांचे हस्तलिखित वारकरी संप्रदायाचा ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 16:11 IST

वारकरी संप्रदायासाठी अलौकीक आणि महत्वपूर्ण असा ‘ठेवा’ आहे .

 वारकरी  संप्रदायामध्ये संत एकनाथ महाराजांचे स्थान अतिशय अलौकीक असेच आहे. संत एकनाथांनी रचियेले  एकनाथी भागवत आणि ज्ञानेश्वरीचे हस्तलिखित संपूर्ण वारकरी संप्रदायासाठी अलौकीक आणि महत्वपूर्ण असा ‘ठेवा’ आहे .वारकरी संप्रदायामध्ये  नाथ षष्ठीला अनन्य साधारण महत्व असून महाराष्ट्राच्या कानाकोपºयातील आणि देशाच्या विविध राज्यातील अनेक आश्रमाचे मठाधिपती, संस्थानचे पदाधिकारी, भाविक आणि वारकरी मोठ्यासंख्येने पैठण येथील दाखल होतात. दरवर्षी या उत्सवात सहभागी होणाºया भजनी दिंडी आणि वारकºयांची संख्या आपलाच उच्चांक दरवर्षी मोडीत काढत आहे.  वारकºयांचे दैवत असलेल्या संत एकनाथांच्या पादुका आणि विजयी पांडुरंग भगवानाचे दर्शन घेण्यासाठी  तल्लीन झालेले असतात. मुखी संत एकनाथांचा जयघोष, मनात संत एकनाथांचे विचार साठवित, या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थिती दर्शवितात.

एकनाथांनी ज्ञानेश्वरीचे केले पुनर्रलिखान!

संत एकनाथ महाराजांनी शके १५२१  फाल्गुन वद्य षष्ठीला गोदावरीमध्ये जल समाधी घेतली होती. तत्पूर्वी त्यांना भाविकांनी परत कधी येणार, असा प्रश्न विचारला असता, संत एकनाथांनी ‘जै धर्माची वाटा मोडे/ अधर्माची शीग चढे//तै आम्हा येणे पडे/ संसार स्थिती//नाना मते पाखंड/ कर्मठायी अति बंड/तयाचे ठेचावे तोंड/हरिभजने// हा अभंग रचियला. तसेच अदैत जगत, कोणत्याही भेदाला थारा न देता, जगाला एकनाथी भागवत दिले. आणि ज्ञानेश्वरीचे पुनर्रलिखान केले.

 

- अनिल तुळशीराम गवईतिरूपती नगर, खामगाव.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक