११ वर्षांनंतर मकर संक्रांत आणि षटतिला एकादशीचा दुहेरी योग; 'या' एका उपायाने मिळेल दुप्पट लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 11:08 IST2026-01-06T11:07:17+5:302026-01-06T11:08:54+5:30
Makar Sankranti 2026: यंदा १४ जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे आणि त्याच दिवशी षटतिला एकादशी आल्यामुळे दोन्ही व्रताचे एकत्र परिणाम साधण्याकरता दिलेला उपाय करा.

११ वर्षांनंतर मकर संक्रांत आणि षटतिला एकादशीचा दुहेरी योग; 'या' एका उपायाने मिळेल दुप्पट लाभ!
मकर संक्रांती(Makar Sankranti 2026) म्हणजे सूर्याचे उत्तरायण आणि षटतिला एकादशी(Shat Tila Ekadashi 2026) म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंची तीळ वापरून करायची विशेष सेवा. २०२६ मध्ये १४ जानेवारी रोजी या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्याने एक अत्यंत शक्तिशाली 'पुण्य योग' निर्माण झाला आहे. ज्योतिषी डॉ. योगेश शर्मा यांच्या मते, या दिवशी केलेली साधना आणि दान केवळ अडलेली कामेच पूर्ण करत नाही, तर सात पिढ्यांचे दोषही दूर करते.
षटतिला एकादशी आणि संक्रांतीचा संगम का आहे खास?
अंकशास्त्र आणि ज्योतिषानुसार, या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूंची कृपा एकत्रित मिळते. 'षटतिला' म्हणजे सहा प्रकारे तिळाचा वापर. संक्रांतीलाही तिळाचे महत्त्व असल्याने, या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्यासोबतच आर्थिक स्थैर्य लाभते.
प्रगतीसाठी करावयाचे विशेष उपाय
ज्योतिषी डॉ. योगेश शर्मा यांनी या दिवशी विशेष फलप्राप्तीसाठी खालील विधी सुचवले आहेत:
१. श्रीहरी विष्णूंची पूजा व स्तोत्रश्रवण: सकाळी लवकर उठून स्नान करावे. या दिवशी 'विष्णू सहस्त्रनाम' पठण करणे किंवा श्रवण करणे (ऐकणे) अत्यंत प्रभावी ठरते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख-शांती नांदते.
२. विठ्ठल मंदिरात सेवा: तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा. विठ्ठल हे विष्णूंचेच रूप असल्याने संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते.
३. यथाशक्ती दान (महादान): या दिवशी गरजवंतांना दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. दान करताना त्यात तीळ, गूळ, मिठाई आणि वस्त्र यांचा समावेश असावा. संक्रांतीच्या दिवशी केलेले दान हे 'अक्षय' (कधीही न संपणारे) फळ देते.
४. तिळाचा सहा प्रकारे वापर: षटतिला एकादशी असल्याने तिळाने स्नान, तिळाचे उटणे, तिळाचा होम, तिळाचे तर्पण, तिळाचे दान आणि तिळाचे भक्षण असे सहा प्रकार केल्यास संक्रांतीचेही पूर्ण फळ मिळते.
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या मुली असतात निसर्गतः देखण्या आणि आकर्षक
या योगाचे लाभ:
दोष निवारण: कुंडलीतील शनी आणि राहूचे दोष शांत होतात.
आर्थिक लाभ: रखडलेली येणी वसूल होतात आणि नवीन गुंतवणुकीसाठी मार्ग मोकळे होतात. पाहा व्हिडिओ -
आरोग्य: तिळाच्या वापरामुळे हिवाळ्यातील आजारांपासून संरक्षण मिळते.