प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 13:08 IST2025-09-30T13:05:20+5:302025-09-30T13:08:10+5:30

Love marriage Astro:ऑक्टोबरमध्ये शुक्र गोचर होणार आहे, शुक्र हा प्रेम, सुख, ऐश्वर्याचा कारक; तो ठरवतो प्रेमविवाहाचे भाग्य; कसे ते पहा. 

Love marriage Astro: Will your couple be successful after marriage or not? The answer is found in the horoscope! | प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!

प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

आयुष्यातून प्रेम वजा केले की खरंतर काहीच उरत नाही. मनुष्य हा प्रेमाचा भुकेला आहे आणि प्रेम करणारे , आपल्या पाठीवरून हात फिरवून जगण्याची उमेद देणारे कुणी आहे ह्या भावनेवर माणसाला जगायला नक्कीच बळ येते. प्रेमाला वयाचे बंधन नसते, कारण ती एक भावना आहे, संवेदना आहे, जी मनाला जागृत ठेवते. कुणी कुणावर प्रेम करावे? तर जिथे मायेचा ओलावा असतो तिथे  प्रेम शोधत व्यक्ती अपोआप ओढली जाते. लहानपणी आईने केलेले प्रेम त्याला तोड नसते, तारुण्यात प्रेयसीने किंवा पत्नीने पुढे मुलांनी, मित्रांनी केलेलं प्रेम वेगवेगळ्या प्रेमाच्या छटा आयुष्याच्या पटलावर  येत राहतात आणि आपले आयुष्य नितांत सुंदर होते.

October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!

तर अशा या प्रेमावर कालांतराने आपण हक्कसुद्धा गाजवायला लागतो. कुठल्याही अपेक्षा न ठेवता सहज प्रेम करणे हे खरंतर अशक्य आहे, तेही आजच्या कलियुगात! पण ते ज्यांना जमले त्यांना कदाचित त्या खऱ्या प्रेमाचा आस्वाद नक्कीच चाखता आला असेल. आजकाल प्रेम एक व्यवहार झाला आहे.  इतके कृत्रिम झालेय... कलियुग ...कालाय तस्मै नमः! हे प्रेम कोणाबाबतीत यशस्वी होते आणि कोणाबाबत अयशस्वी ते ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून जाणून घेऊ. 

अनेकदा प्रेम कुणावर आणि विवाह कुणावर ह्याचा मेळ नसतो. चंद्र हा मनाचा कारक, सात्विक शुभग्रह. चंद्र मनाचा कारक आणि मन आसुसलेले असते ते प्रेमासाठी. पत्रिकेतील पंचम भाव आणि पंचमेश आपल्या आयुष्यात प्रेम कसे कुणाकडून कधी किती मिळणार ह्याचे दर्शक आहे. पंचमेश सप्तमात आणि सप्तमेश पंचमात असेल तर प्रेमाचे रुपांतर विवाहात होते अन्यथा नाही. प्रेम विवाह करून कालांतराने ते मोडल्याची उदाहरणे आपण पाहतोच!

October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या

शुक्र हा प्रेमाचा प्रतिक दाखवणारा शुभ ग्रह आहे. प्रेम, सौंदर्य, माया ह्याचा भोक्ता शुक्र ग्रह पत्रिकेत मुख्य भूमिका बजावत असतो. त्यावर प्रेमाचा खरा अविष्कार ठरत असतो. मिनेतील शुद्ध सात्विक प्रेम उच्चीचा शुक्र इथे प्रदान करतो पण हाच शुक्र कन्या राशीत भौतिक सुखापेक्षा व्यावहारिक प्रेम देतो. हर्शलसुद्धा शुक्रासोबत किंवा प्रतियोगात असेल तर प्रेमाचे वाटोळे करायला समर्थ ठरतो.

सिंह राशीतील शुक्र मादकता, आकर्षण निर्माण करेल, पण ह्यांचे प्रेम एखाद्या सिनेमातील प्रेयसीसारखे असेलच असे नाही. लग्नी असलेला सिंहेतील शुक्र हा आकर्षण निर्माण करतो. राहू केतू ह्यांनी शुक्राला बिघडवले तर त्यातील शुभ सात्विक गुणांना सुरुंगच लागतो. अनेकदा हा शुक्र त्रिक भावात असून दुषित असेल तर प्रेम फिसकटते. अष्टमेश शुक्र जर पंचम भावात असेल तर एखादे प्रेम प्रकरण हमखास होते आणि ते  टिकत नाही हा अनुभव आहे.

शुक्रासोबत असलेला राहू फसवणूक आणि संसार सुख देत नाही. राहू हा भास संशय निर्माण करणारा तसेच अनेक भावनिक स्थित्यंतरे करवतो. राहू असेल तर गैरसमज निर्माण होवून वैवाहिक सौख्य नष्ट होते आणि काडीमोड होईपर्यंत मजल जाते. अनेकदा राहू शुक्र युती प्रचंड आकर्षण निर्माण करते पण ते एक मोहजाल असते, न टिकणारे . जितक्या लवकर आकर्षणाने दोघे एकत्र येतात अर्थात त्यात शारीरिक आकर्षणाचा भाग अधिकतम असतो, तिथे प्रेमाचा लवलेश सुद्धा नसतो त्यामुळे ते हवेत विरून जाते.

Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!

आयुष्यातील कुठल्याही सुख आणि दु:खात, चढ-उतारात जे एकमेकांचा हात सोडत नाहीत, ते खरे प्रेम म्हणायला हवे असे माझे मत आहे. नुसता पैसा , बाह्य सौंदर्य ज्या शाश्वत नाहीत, ह्यावर भूलणे म्हणजे प्रेम नाहीच. एखाद्याचे व्यंग किंवा कमतरता स्वीकारून त्याच्यासोबत जगणे आणि त्यालाही जगायला बळ देणे हे प्रेम आहे . चंद्र शुक्र हे प्रेम बहाल करतात जेव्हा ते पत्रिकेत सुसिस्थितीत असतात. राहू हव्यास, हाव निर्माण करेल, पण तो एक क्षणिक दिखावा असतो. सप्तम भाव हा जोडीदाराचा त्यात शनी असेल तर जोडीदार रंगेल, काव्य करणारा रसिक असा मिळणार नाही पण त्याचे प्रेम काहीही झाले तरी दीर्घकाळ टिकणारे असेल. पंचमेश सप्तमेश शुभ असतील आणि शुभ दृष्टीत असतील तर प्रेम यशस्वी होते. पापकर्तरी योगातील चंद्र किंवा शुक्र, कमकुवत बलहीन चंद्र शुक्र, पाप ग्रहांच्या दृष्टीत किंवा युतीत असणारे हे दोन ग्रह खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवतील. ग्रहांची अनेक समीकरणे, युती , दृष्टीयोग प्रेमाचा आस्वाद देणार की त्यात आपण अथांग भिजूनही कोरडेच राहणार हे दर्शवत असतात त्यामुळे सखोल अभ्यास हवाच.

आयुष्यात जे आहे ते स्वीकारता आले पाहिजे. प्रेम करायला आणि प्रेम निभवायलाही शिकले पाहिजे . तरच त्याचे अनेक पैलू आणि रंग समजतील आणि त्यासोबत जगणे सोपे होईल.
 
संपर्क : 8104639230

Web Title: Love marriage Astro: Will your couple be successful after marriage or not? The answer is found in the horoscope!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.