खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 12:57 IST2025-11-20T12:49:32+5:302025-11-20T12:57:59+5:30

Khandoba Navratra 2025: यंदा २१ ते २६ नोव्हेंबर खंडोबाचे षडरात्रोत्सव असणार आहे, आपण आपल्या घरी या व्रताचे पालन कसे करावे ते विधिवत जाणून घ्या. 

Khandoba Navratra 2025: Khandoba's Shadaratri festival is not just a festival but a family tradition; see the worship literature and fasting rituals | खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी

खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी

२१ नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष महिना सुरु होत आहे. त्याचा पहिला दिवस अनेक कारणांनी महत्त्वाचा मानला जातो, त्यात विशेष महत्त्वाचे असते ते खंडोबाचे षडरात्रोत्सव(Khandoba Navratra 2025) आणि देवदिवाळी. यापैकी देवदिवाळी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला एक दिवस साजरी केली जाते. का, कशी याची माहिती इतर लेखात मिळेलच. सदर लेखात आपण खंडोबाच्या षडरात्रोत्सवाची माहिती घेऊ. 

२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना

महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये खंडोबाचे षडरात्रोत्सव अर्थात खंडोबाचा सहा दिवसाचा उत्सव कुलधर्म कुलाचार म्हणून केला जातो. मार्गशीर्ष प्रतिपदेला हा उत्सव सुरू होऊन चंपाषष्ठीला(Champashashthi 2025) तो संपतो. या निमित्ताने कोणता कुलाचार केला जातो ते जाणून घेऊ. 

पूर्वी मणी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांचा खूपच छळ केला. तेव्हा शंकरानी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्या दैत्यांशी मोठे युद्ध केले आणि मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपक वनात मणी मल्ल दैत्याचा वध केला. तेव्हापासून ही षष्ठी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते. मणिमल्ल दैत्याचा वध केला म्हणून शंकराला मल्लारी(मल्ल अरी म्हणजे मल्ल नावाच्या दैत्याचा शत्रू) मल्लारीमार्तंड, खंडोबा, खंडेराय असे नाव पडले. 

एकार्थाने ही शिवपूजाच आहे, अनेकांच्या घरी हा कुलाचार म्हणून केली जाते, पण तुम्ही शिवपूजा म्हणूनही हा उत्सव पुढील प्रकारे करू शकता. 

पूजेचा विधी : एका ताम्हनामध्ये किंवा ताटामध्ये श्रीफळ, सुपारी, विड्याची पाने, फळे आणि भंडारा ठेवतात. तेथे नजीकच एका कलशावर श्रीफळ ठेवून त्याची पूजा करतात. खंडोबाला आवाहन करतात. त्या कलशात खंडोबाचे तेज अवतरले असे समजून त्याची पूजा करतात. 

नंतर तुपाचे निरांजन लावून ते ताम्हनात ठेवतात व ते ताम्हण कलशाभोवती तीनदा ओवाळतात. मग कलशावरचे श्रीफळ उचलून कपाळाला लावतात. या वेळी सर्व जण 'येळकोट मल्हार- चांगभलं' असे म्हणत खंडोबाची करुणा भाकतात. खंडोबाला नैवेद्य दाखवून चंपाषष्ठीला अर्थात सहाव्या दिवशी पूजेचे उद्यापन करतात. यंदा २६ नोव्हेंबर रोजी चंपाषष्ठी आहे. 

देवदिवाळी २०२५: कशी साजरी करतात देवदिवाळी? काय असतो नैवेद्य आणि कोणत्या देवांची होते पूजा? वाचा 

खंडोबाची अनेक नावे आणि अनेक रूपे आहेत. काही मुसलमान बांधव खंडोबाचे भक्त असतात. ते खंडोबाला मल्लुखान म्हणतात. कर्नाटक, आंध्र वगैरे भागात  मैलार- मैराळ म्हणजेच खंडोबा हे कुलदैवत आहे. मद्रासची उपनगरी मैलापुर हे मैलारचे मूळ गाव होय. 

जेजुरी, निमगाव, पाली पेम्बर, नळदुर्ग, शेंगुड, सातारे, मालेगाव (नांदेड), मैलापुर, मैलारसिंग, देवरगुड्डू, मणमैलार वगैरे खंडोबाची तीर्थक्षेत्रे आहेत. लग्न झालेली नवदाम्पत्ये जेजुरीला किंवा त्यांचे कुलदैवत खंडोबा ज्या गावी असेल त्या गावी जाऊन तळी आरती करतात. हा कुलाचार आहे. त्याला आहेर यात्रा म्हणतात. 

Numerology: कोणत्या मूलांकाची पत्नी ठरते पतीसाठी भाग्यवान? लग्नानंतर होतो भाग्योदय

तर आपणही मणी मल्ल दैत्यांचा नाश करणाऱ्या शंकराच्या अवताराला अर्थात खंडोबाला चंपाषष्ठीच्या निमित्ताने स्मरण, पूजन करून भक्तिभावाने बेल भंडारा वाहूया. जय मल्हार!

Web Title : खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबा के षडरात्रोत्सव की पूजा विधि और महत्व

Web Summary : खंडोबा नवरात्र, एक छह दिवसीय त्योहार जो पारिवारिक परंपरा के रूप में मनाया जाता है, मार्गशीर्ष प्रतिपदा को शुरू होता है और चंपाषष्ठी को समाप्त होता है। यह शिव की राक्षस मणि और मल्ला पर विजय का प्रतीक है। इस उत्सव में खंडोबा की सुपारी, नारियल और हल्दी पाउडर से पूजा की जाती है, 'येळकोट मल्हार - चांगभला' का आह्वान किया जाता है और नैवेद्य अर्पित किया जाता है।

Web Title : Khandoba Navratra 2025: Rituals, worship of Lord Khandoba explained.

Web Summary : Khandoba Navratra, a six-day festival celebrated as a family tradition, begins on Margashirsha Pratipada and ends on Champashashti. It commemorates Shiva's victory over demons Mani and Malla. The festival involves worshipping Khandoba with betel leaves, coconuts and turmeric powder, invoking 'Yelkot Malhar - Changbhala' and offering Naivedya.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.