कामदा एकादशी २०२६: रखडलेली कामे मार्गी लागतील, एकादशीला करा 'हा' विधी; मिळवा सुख-समृद्धी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 09:29 IST2026-03-28T09:29:11+5:302026-03-28T09:29:39+5:30
Kamada Ekadashi 2026: २९ मार्च २०२६ रोजी येणाऱ्या कामदा एकादशीला तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी करा 'हा' एक विशेष विधी. जाणून घ्या योग्य पूजा पद्धत आणि सुख-समृद्धी मिळवण्याचे सोपे उपाय.

कामदा एकादशी २०२६: रखडलेली कामे मार्गी लागतील, एकादशीला करा 'हा' विधी; मिळवा सुख-समृद्धी!
२९ मार्च २०२६ रोजी हिंदू नववर्षातील पहिली 'कामदा एकादशी(Kamada Ekadashi 2026) साजरी केली जाणार आहे. या एकादशीला मनातील सात्विक इच्छा पूर्ण करणारी तिथी मानले जाते. मात्र, कोणतेही व्रत पूर्ण फळ तेव्हाच देते, जेव्हा ते शास्त्रोक्त पद्धतीने आणि योग्य नियम पाळून केले जाते.
कामदा एकादशी २०२६: तुमची इच्छा पूर्ण होणार, कामदा एकादशी 'या' राशींसाठी भाग्योदय घेऊन येणार!
कामदा एकादशीचे व्रत हे केवळ उपवास करण्यापुरते मर्यादित नसून, ते मनाचे शुद्धीकरण करण्याचे एक साधन आहे. या दिवशी भगवान विष्णूची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. त्यासाठी पूजा विधी, नियम जाणून घेऊ.
१. संपूर्ण पूजा विधी
ब्रह्म मुहूर्त: सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे (पिवळा रंग विष्णूंना प्रिय आहे).
संकल्प: पूजेच्या ठिकाणी बसून हातात पाणी घेऊन व्रताचा संकल्प करावा.
स्थापना: एका चौरंगावर पिवळे कापड अंथरून भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा.
पूजा: देवाला गंध, अक्षता, पिवळी फुले आणि तुळशीची पाने अर्पण करावीत. (लक्षात ठेवा, विष्णू पूजेत तुळस अनिवार्य आहे. मात्र एकादशी रविवारी आल्यामुळे आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी तुळस खुडून ठेवावी).
धूप-दीप: शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि विष्णू सहस्त्रनामाचे किंवा 'ओम नमो भगवते वासुदेवाय' मंत्राचा जप करावा.
नैवेद्य: फळे किंवा सात्विक पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.
२. एकादशी व्रताचे महत्त्वाचे नियम
दशमीपासून सुरुवात: एकादशीचे नियम खरं तर आदल्या दिवशी (दशमी) सूर्यास्तापासून सुरू होतात. दशमीला सात्विक भोजन करावे.
निर्जला किंवा फलाहार: शक्य असल्यास निर्जला (पाण्याशिवाय) उपवास करावा, अन्यथा फलाहार घेऊन व्रत करावे.
नामस्मरण: या दिवशी मौन पाळणे किंवा जास्तीत जास्त वेळ भगवंताच्या नामस्मरणात घालवणे उत्तम मानले जाते.
जागरण: एकादशीच्या रात्री जागरण करून भजन-कीर्तन केल्याने व्रताचे पूर्ण फळ मिळते असे शास्त्र सांगते.
Ritual: आजारपण आणि दारिद्र्य तुमच्या घराचा रस्ता विसरतील! जेवणापूर्वी करा 'हा' विधी!
३. चुकूनही करू नका 'या' ५ चुका
बऱ्याचदा आपण भक्तीच्या ओघात काही चुका करतो, ज्या टाळणे आवश्यक आहे:
भात खाणे: एकादशीला भात खाणे वर्ज्य आहे, कारण या दिवशी तांदळात 'अशुभ अंश' असतो असे मानले जाते.
तुळस तोडणे: एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नका. पूजेसाठी लागणारी पाने आदल्या दिवशीच तोडून ठेवावीत.
राग आणि निंदा: कुणाबद्दलही वाईट बोलणे किंवा रागवणे टाळावे, अन्यथा व्रताची ऊर्जा आणि पुण्य नष्ट होते.
दिवसा झोपणे: एकादशीला दिवसा झोपणे शास्त्रानुसार चुकीचे मानले जाते; हा वेळ भगवंताच्या नामस्मरणात घालवावा.
कांदा-लसूण: उपवास नसला तरी घरातील अन्नात कांदा आणि लसूण वापरू नका, कारण ते तामसिक मानले जातात.