येत्या २ एप्रिल २०२६, गुरुवार रोजी चैत्र पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर 'हनुमान जन्मोत्सव(Hanuman Jayanti 2026) साजरा केला जाणार आहे. संकटातून मुक्ती देणारा आणि सुख-समृद्धी देणारा हा दिवस भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. परंतु, हनुमंताची उपासना करताना काही कडक नियम पाळणे आवश्यक आहे. जर या नियमांत चूक झाली, तर उपासनेचे पूर्ण फळ मिळत नाही.
हनुमान हा 'संकटमोचन' आहे, पण त्याच्या पूजेचे नियम इतर देवांच्या तुलनेत थोडे कठीण आणि शिस्तबद्ध आहेत. २ एप्रिल रोजी मारुतीरायाची कृपा मिळवायची असेल, तर खालील गोष्टींपासून दूर राहणेच हिताचे ठरेल.
१. ब्रह्मचर्य आणि वामकुक्षी (Celibacy & Day Sleep)
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करावे. या दिवशी मन केवळ हनुमंताच्या चरणी असावे. तसेच, या दिवशी दिवसा झोपणे (वामकुक्षी) टाळावे, त्याऐवजी नामस्मरण किंवा स्तोत्र पठण करावे.
२. आहार आणि व्यसनांपासून दूर (Dietary Rules)
हा दिवस अत्यंत पवित्र असल्याने केवळ शाकाहाराचा अवलंब करावा. मांसाहार किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन (दारू, तंबाखू इ.) करू नये. असे केल्यास तुमची उपासना खंडित होऊ शकते.
३. कपड्यांच्या रंगाची निवड (Clothing Choice)
हनुमानाची पूजा करताना कधीही पांढरे किंवा काळे कपडे परिधान करू नका. हे रंग या दिवशी निषिद्ध मानले जातात. त्याऐवजी हनुमंताला प्रिय असलेले लाल, भगवे किंवा पिवळे कपडे घालणे शुभ मानले जाते.
Numeroloy: अंकशास्त्र सांगतंय तुमच्या जन्मतारखेचं गुपित; तुमचं मॅजिकल गिफ्ट तुम्हाला माहित आहे का?
४. भग्न मूर्ती किंवा तसबिरीची पूजा टाळा (Broken Idols)
घरात हनुमानाची कोणतीही भग्न (तुटलेली) मूर्ती किंवा फाटलेली तसबीर असेल, तर तिची पूजा करू नका. अशा वस्तूंचे आजच्या दिवशी वाहत्या पाण्यात विसर्जन करावे आणि नवीन मूर्तीची शास्त्रोक्त स्थापना करून पूजा करावी.
५. सुतक असल्यास घ्यायची काळजी (Rules for Sutak)
जर कुटुंबात कोणाचा मृत्यू झाला असेल आणि 'सुतक' चालू असेल, तर हनुमान जयंतीचा उपवास किंवा मूर्तीपूजा करू नये. अशा वेळी तुम्ही मनोमन किंवा दूर बसून मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसाचे पठण करू शकता.
६. पाद्यपूजा कोणाची करावी? (Padya-Puja Logic)
हनुमंत स्वतःला प्रभू श्रीरामाचा निष्ठावान सेवक मानतो. त्यामुळे हनुमानाची पाद्यसेवा (पायांची पूजा) करू नये. जर तुम्हाला पाद्यपूजा करायचीच असेल, तर ती श्रीरामांच्या पादुकांची करावी. हनुमानाला नैवेद्य म्हणून गुळ-खोबरे, हरभरा डाळ, बुंदीचे लाडू किंवा इमरती अर्पण करावी.
७. महिलांसाठी विशेष नियम (Rules for Women)
हनुमान हा 'बालब्रह्मचारी' आहे. त्यामुळे महिलांनी हनुमंताच्या मूर्तीला स्पर्श करणे टाळावे. दुरून नमस्कार करून किंवा हनुमान चालिसा वाचून महिला आपली भक्ती व्यक्त करू शकतात.
भक्तीचे हे नियम पाळले आणि मनोभावे पूजा अर्चा केली तर हनुमंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. बजरंग बली की जय!
Web Summary : On Hanuman Jayanti, devotees should follow strict rules for worship. Avoid celibacy during the day, adhere to a vegetarian diet, and wear auspicious colors. Women should avoid touching the idol. Following these rules brings Hanuman's blessings.
Web Summary : हनुमान जयंती पर, भक्तों को पूजा के लिए सख्त नियमों का पालन करना चाहिए। दिन के दौरान ब्रह्मचर्य से बचें, शाकाहारी भोजन का पालन करें और शुभ रंग पहनें। महिलाओं को मूर्ति को छूने से बचना चाहिए। इन नियमों का पालन करने से हनुमान का आशीर्वाद मिलता है।