यंदा दिनदर्शिकेनुसार १ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा आहे आणि २ एप्रिल रोजी हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2026 Date) आहे. मात्र आपण तिथीनुसार चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करतो, मग तारखांमध्ये हा भेद का झाला आहे आणि या उत्सवाला नक्की जयंती म्हणावे की जन्मोत्सव म्हणावे यावर सविस्तर उत्तर जाणून घ्या.
हनुमान जयंती २०२६: राहू-केतूची अशांती आणि शनीची साडेसाती? तुळशीचे रोप देईल सर्व संकटांतून मुक्ती!
१ की २ एप्रिलला, यावर्षी हनुमान जयंती कधी आहे?
यंदा १ एप्रिल रोजी चैत्र शुद्ध पौर्णिमा सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी सुरु होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती २ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजून ४१ मिनिटांनी होत आहे. हिंदू धर्मात जी तिथी सूर्योदय पाहते, ती उत्सवासाठी ग्राह्य धरली जाते. त्यानुसार पौर्णिमा तिथी १ एप्रिल रोजी सूर्योदयानंतर सुरु होत असून २ एप्रिलचा सूर्योदय बघणार आहे. त्यामुळे हनुमान जन्मोत्सव वा जयंती २ एप्रिल रोजी सकाळी ६. ४० मिनिटांनी साजरी केली जाईल.
आता प्रश्न येतो जयंती म्हणावे की जन्मोत्सव?
काळानुकाळ आपण चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच संबोधत आलो आहोत. मात्र अनेकदा शब्दच्छलामुळे उत्सवाचा आनंद बाजूला राहतो आणि विषयांतर घडते. हनुमान जन्मोत्सवाबद्दलदेखील जयंती की जन्मोत्सव हा नवीन वाद निर्माण झाल्यामुळे दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी जयंती व जन्मोत्सवाबद्दल मत मांडून या वादावर पडदा टाकला आहे. आपणही सदर माहिती वाचून मनातील संभ्रम दूर करूया आणि या वादाला पूर्णविराम देत उत्सवाचा मूळ उद्देश सफल करूया.
दाते पंचांगकर्ते मोहन दाते सांगतात -
◆जो जन्माला येतो त्याची जयंती केली जाते आणि जो मुत्यु पावतो त्याची पुण्यतिथी केली जाते आणि जे समाधि घेतात त्यांचा समाधि उत्सव केला जातो, त्यामुळे जयंती आणि जन्मोत्सव हे समानार्थी शब्द असून विनाकारण शब्दच्छल करुन वेगळा अर्थ काढला जात आहे !
◆ जो मृत्यु पावतो त्याची जयंती साजरी करावी असे कुठेही सांगितलेले नाही . मात्र जो मृत्यु पावतो त्याची जयंती व पुण्यतिथी दोन्ही करता येते
◆जयंती ही सुद्धा उत्सव म्हणूनच साजरी केली जाते तेंव्हा जन्मोत्सव व जयंती हे समानार्थी आहेत, (परशुराम व मार्कण्डेय सुद्धा चिरंजीव आहेत तिथे सुद्धा श्री परशुराम जयंती व मार्कण्डेय जयंतीअसेच म्हटले आहे.)
◆ तसेच अनेक ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव आणि जयंती ऐवजी श्रीराम नवमी पण म्हंटले जाते आणि श्रीकृष्ण जयंती ऐवजी श्रीकृष्णाष्टमी असे सुद्धा शब्द प्रयोग केले जातात, तसेच गीता हा ग्रंथ असून मोक्षदा एकादशीला गीता जयंती पण साजरी होते, तेव्हा विनाकारण शब्दच्छल करण्यात काहीच अर्थ नाही!
Ritual: आजारपण आणि दारिद्र्य तुमच्या घराचा रस्ता विसरतील! जेवणापूर्वी करा 'हा' विधी!
◆ देवता व अवतार यांच्याबाबत उत्सवापेक्षा जयंती साजरी करणे हे अधिक योग्य असणार आहे. कारण जयंतीचे पारणेसुद्धा महत्त्वाचे असते एखाद्या उत्सवाचे पारणे हा शब्दप्रयोग उचित वाटत नाही आता याविषयी विराम!
वरील माहिती वाचून आपल्याही मनातील संभ्रम दूर झाला असेल हे निश्चित! हनुमंताप्रमाणे शक्ती, युक्ती व भक्तीवर लक्ष केंद्रित करूया!
Web Summary : Hanuman Jayanti falls on April 2nd, 2026. Confusion arises whether to call it 'Jayanti' or 'Janmotsav.' Expert Mohan Date clarifies they are synonymous, urging focus on devotion. Celebration trumps semantics.
Web Summary : हनुमान जयंती 2 अप्रैल, 2026 को है। 'जयंती' या 'जन्मोत्सव' कहने को लेकर भ्रम है। विशेषज्ञ मोहन दाते स्पष्ट करते हैं कि वे पर्याय हैं, भक्ति पर ध्यान केंद्रित करने का आग्रह करते हैं। उत्सव शब्दार्थ पर भारी पड़ता है।