शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडवा ते रामनवमी: दररोज १३ वेळा रामरक्षा पठणाने होईल भाग्योदय; पाहा मंत्रसिद्ध करण्याचा विधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 16:29 IST

Chaitra Navratri 2026: दरवर्षीप्रमाणे यंदाही १९ ते २६ मार्च श्रीराम नवरात्र साजरी केली जाईल, या काळात रामरक्षा मंत्र पठणाने होणारे चमत्कारिक बदल अनुभवा.

यंदा १९ मार्च २०२६ रोजी गुढी पाडवा(Gudi Padwa 2026) आहे आणि त्या दिवसापासून चैत्र नवरात्र(Chaitra Navratri 2026) सुरू होत आहे, तिलाच राम नवरात्र असेही म्हणतात. कारण या कालावधीत प्रभू श्रीराम चंद्रानी दुष्ट रावणाचा वध करून सीता माई आणि लक्ष्मणासह १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत आगमन केले होते. तो दिवस उत्सवासारखा साजरा करण्यात आला होता. अयोध्यावासियांनी दारोदारी गुढ्या, तोरणं बांधून, रांगोळ्या काढून, सजावट करून श्रीरामांचे स्वागत केले होते. गुढी हे श्रीरामांच्या विजयाचे प्रतीक म्हणून उंचच उंच बांधले गेले. तेव्हापासून हा कालावधी श्रीराम नवरात्र म्हणून साजरा होऊ लागला. ही नवरात्र राम नवमीला(Ram Navami 2026) म्हणजेच २६ मार्च २०२६ रोजी संपेल. 

यंदाही आपण श्रीराम नवरात्र साजरी करणार आहोत, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. राम नवमी निमित्त आपण उपासना करणार आहोत, पण त्यासाठी आधार घेऊया समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या संदेशाचा! त्यात रामरक्षा स्तोत्र पठणाचे महत्त्व आणि ती सिद्ध कशी करता येईल याचा विधी दिला आहे तो समजून घ्या!

रामरक्षा कधी व किती वेळा म्हणावी?

रोज एकदा ठराविक ठिकाणी ठरावीक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते. किंवा गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात दररोज १३ वेळा रामरक्षा म्हटल्याने ती सिद्ध होते. 

रामरक्षाचे इतर फायदे:

१) अशुभ शक्तीपासुन बचाव करते .
२) राहु - केतु महादशेचा त्रासातून मुक्ती मिळते.
३) कर्जमुक्ती व कर्जवसुली साठी फायदेशीर ठरते. त्यासाठी 'आपदामपहर्तारम....' हा श्लोक १ लक्ष वेळा म्हणल्याचे ऋणमुक्ती हे फळ मिळते.
४) रामरक्षेमध्ये प्रत्येक अवयवाचे स्वतंत्र पाठ आहेत त्या त्या पाठाचे सतत पठण केल्याने त्याचे स्वतंत्र फलित मिळते.
उदा: कौसल्याये दृशो पातु:....हा श्लोक सतत म्हटल्याने डोळ्यांचे विकार बरे होतात...ई.

रामरक्षेचे नियम :

>>रामरक्षा आपणांस जमेल तेव्हा वर्षभरातील कोणत्याही पोर्णिमेपासुन पठण करण्यास सुरुवात करणे लाभदायक ठरते.
>> रामरक्षा रोज एकदा ठरावीक ठिकाणी ठरावीक वेळीच म्हणावी. वेळ व जागा बदलु नये
>>तसेच त्या त्या आजारपणात अनुकूल श्लोकपठण केल्यास आजारपणातुनही मुक्ती मिळते.
>>ह्या श्लोकपठणाचे १५००० पाठ जप करणे.
>> जपाच्या बरोबरीने आजारी व्यक्तीच्या नावाने अभिमंत्रित केलेले " श्री रामरक्षा सिद्ध यंत्र " सतत जवळ ठेवावे. म्हणजे त्वरीत आजारपणातुन मुक्तता होते.
>>हातपाय धुवून, शुचिर्भूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही. 
>>कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ति उत्पन्न होते व ती आपले सदा सर्वकाळ रक्षण करते. आबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी. त्याच्यापासून निश्चित फायदा आहेच.

रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे.

कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी नऊवेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा. अनुष्ठान म्हटले की त्याच्या यमनियमांचे पालन करणे झालेच. याचा अनुभव आल्याशिवाय राहात नाही.

श्रीरामरक्षा’ ह्या स्तोत्राचे महत्व काय?

श्रीरामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे. प्रभु रामचंद्रांना ‘मर्यादा पुरुषोत्तम‘ असे म्हणतात. प्रभु रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की, प्रभु रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पति या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे. बुधकौशिक ऋषिंच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ram Raksha Pathan: Benefits, rules, and method for fulfillment

Web Summary : Chaitra Navratri, starting Gudi Padwa, is ideal for Ram Raksha recitation. Reciting it 13 times daily brings prosperity, protects from negativity, relieves debt, and heals ailments. Regular recitation with devotion is key.
टॅग्स :Gudi Padwaगुढीपाडवा 2026Ram Navamiराम नवमीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधी