शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
2
₹6700000 चं टॉयलेट, ₹76000 चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
3
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
4
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
5
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
6
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
7
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
8
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
9
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
10
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
11
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
12
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
13
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
14
कोहली-ऋतुराजचा शतकी धमाका; KL राहुलचं अर्धशतक! टीम इंडियानं द. आफ्रिकेसमोर ठेवलं ३५९ धावांचे लक्ष्य
15
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
16
मायेचं नातं! १२ वर्षांनंतर मुलीने पहिल्यांदाच ऐकला आईचा आवाज; डोळे पाणावणारा Video
17
तुमचे पैसे SBI, HDFC किंवा ICICI बँकेत असेल तर खुशखबर! RBI ने 'या' ३ बँकांसाठी केली मोठी घोषणा
18
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
19
५ मुलांची आई भंगारवाल्याच्या प्रेमात पडली! वयाचाही विचार केला नाही; पतीसमोर बांधली दुसरी लग्नगाठ
20
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
Daily Top 2Weekly Top 5

दत्त जयंती २०२५: पारायण पूर्ण झाल्यावर आवर्जून म्हणा ‘आरती श्रीगुरुचरित्राची’; पाहा, महती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 16:21 IST

Datta Jayanti 2025 Aarti Gurucharitrachi: गुरुचरित्र पारायण झाल्यावर गुरुचरित्राची आरती अवश्य म्हणावी, असे सांगितले जाते.

Datta Jayanti 2025 Aarti Gurucharitrachi: गुरुवार, ०४ डिसेंबर २०२५ रोजी दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष महिन्याची ही पौर्णिमा २०२५ मधील शेवटची पौर्णिमा आहे. दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते, असे म्हटले जाते. त्यामुळे दत्त उपासना, नामस्मरण करणे शुभ पुण्य फलदायक मानले जाते. या निमित्ताने गुरुचरित्र पारायण केले जाते. गुरुचरित्र पारायण झाल्यावर गुरुचरित्राची आरती अवश्य म्हणावी. त्याचसोबत दत्तगुरू, श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याही आरत्या आवर्जून म्हणाव्यात.

दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु‌ हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिकाण्ड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे, याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने  आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलाला आहे. या गुरुचरित्र ग्रंथाची महती आणि महात्म्य सर्वोच्च आहे. तसेच गुरुचरित्राच्या पारायणामुळे अनेकांना अद्भूत अनुभव आल्याचे सांगितले जाते.

आरती श्रीगुरुचरित्राची

मूर्तित्रयगुणसारं निर्गुणविस्तारं ।षड्गुणपारावारं दुर्जनसंहारं ।भक्तिप्रियदातारं कल्पितपरिपारं ।मुनिजनमानसहारं निगमागमसारं ॥ १ ॥ जय देव जय देव वंदे गुरुचरितं । कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।जय देव जय देव ॥ धृ. ॥

श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर कृतकृत्यं ।नरहरि भारति लीला ब्रह्मादिस्तुत्यं ।कलिमलदाहक मंगलदायक  फलनित्यं ।पारायण देहि मे पुस्तकमपि चित्यं ॥ २ ॥ जय देव जय देव वंदे गुरुचरितं । कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।जय देव जय देव ॥ धृ. ॥

त्वद्रतलीलासारं श्रृतिसकलाकारं ।कांडत्रयविस्तारं प्रत्ययलघुकारं ।कल्पद्रुमफलभारं कल्पित्तदातारं ।पठणामृतरसधारं भवभयपरिहारं ॥ ३ ॥जय देव जय देव वंदे गुरुचरितं । कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।जय देव जय देव ॥ धृ. ॥

अगाध श्रीगुरुकरुणं भूइच्छातरणं ।ज्ञानामृतरसभरणं जडजीवोद्धारणं ।भक्त्या कृतमपि स्मरणं तापत्रयहरणं ।नियमाराधित महिमा मोक्षश्रीवर्णं ॥ ४ ॥जय देव जय देव वंदे गुरुचरितं । कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।जय देव जय देव ॥ धृ. ॥

श्रीगुरुकरुणाकृत्यं सिद्धेश्र्वरगीतं ।शारदगंगाधरसुतमथितं नवनीतं ।भाविकभक्तप्रियकर कृतलोककदतं ।तद्रेतशेषं वांछित सखा हरिहरचित्तं ॥ ५ ॥जय देव जय देव वंदे गुरुचरितं । कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।जय देव जय देव ॥ धृ. ॥

आरती दत्तगुरुंची

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।अभाग्यासी कैची कळेल ही मात ॥पराही परतली तेथे कैचा हा हेत ।जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥ जय देव जय देव...॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।भावे साष्टांगे प्रणिपात केला ॥प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥ जय देव जय देव...॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।हरपले मन झाले उन्मन ॥मी तू पणाची झाली बोळवण ।एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥ जय देव जय देव...॥

आरती श्रीपाद श्रीवल्लभ

गोदातट पवित्र पिठीकापूर स्थान ।सगुण रूपाने करिसी जगताला धन्य ।।आपळ - सुमती - बापन्नासी भाससी तू सान ।निर्गुण रूपे भूषविसी ब्रह्मांडाचे आसन ।। जयदेव जयदेव जय सदगुरु दत्ता हो श्री सद्गुरु दत्ता ।श्रीपाद श्रीवल्लभ परब्रह्म रूपा जयदेव जयदेव ।।१।।

संकल्पासी कथूनी तू कार्यासी धरिसी ।मुनिजन - साधू - भक्ता निर्भय तू करिसी ।।खल - कली - कामी जनांही तू उद्धरसी ।अभिनव लीले पातक कर्मा नाशविसी ।। जयदेव ० ।।२।।

अंध पंगु भ्रात्यांना आरोग्य ते दिधले ।कुरवपुरासी जाऊनी मुनिजन उद्धरिले ।।दर्शन मात्रे तुझिया अनेका संतत्व ते फळले ।प्रिती तुजवर जडुनि कर्मांचे बंधन हे जळले ।। जयदेव ० ।।३।।

नामानंदासी दाखविले चांडाळाचे रूप ।वल्लभदासासी आणिले अरण्यातून सुखरूप ।।लोहकारासी रक्षुनी धरिसी गाडीवानाचे रूप ।निमिषमात्रे करिसी रजकाचा तू नृप ।। जयदेव ० ।।४।।

ब्रह्मा - विष्णू - महेश्वरांचा तू अनघा अवतार ।निर्गुण ब्रह्म सनातनाचा अनंत आधार ।।नेती-नेती म्हणता पुढती पडले समस्त श्रुतीसार ।।दत्तदासावरी असावा तव कृपेचा कर ।। जयदेव ० ।।५।। 

श्री नृसिंह सरस्वती आरती

कृष्णा पंचगंगा संगम निजस्थान ।।चरित्र दाउनि केले गाणगापुरि गमन ।।तेथें भक्तश्रेष्ठ त्रिविक्रमयति जाण ।।विश्वरूपें तया दिधलें दर्शन ॥ १ ॥

जय देव जय देव जय सद्‌गुरु दत्ता ।।नृसिंह सरस्वति जय विश्वंभरिता ॥ धृ. ॥

वंध्या साठी वर्षे पुत्रनीधान ।।मृत ब्राह्मण उठवीला तीर्थ शिंपून ॥।वांझ महिषी काढवि दुग्ध दोहोन ।।अंत्यवक्रें वदवी निगमागम पूर्ण ॥ २ ॥।जय देव जय देव जय सद्‌गुरु दत्ता ।।नृसिंह सरस्वति जय विश्वंभरिता ॥ धृ. ॥

शुक्लाकाष्टीं पल्लव दावुनि लवलाही ।।कुष्ठी ब्राह्मण केला शुद्ध निजदेही ॥।अभिनव महिमा त्याचा वर्णूं मी कायी ।।म्लेंच्छराजा येउनि वंदी श्रीपायीं ॥ ३ ॥।जय देव जय देव जय सद्‌गुरु दत्ता ।।नृसिंह सरस्वति जय विश्वंभरिता ॥ धृ. ॥

दिपवाळींचे दिवशीं भक्त येउनि ।।आठहि जण ठेवीत मस्तक श्रीचरणीं ॥।आठहि ग्रामीं भिक्षा केली तद्दीनीं ।।निमिषमात्रे तुंतक नेला शिवस्थानीं ॥ ४ ॥।जय देव जय देव जय सद्‌गुरु दत्ता ।।नृसिंह सरस्वति जय विश्वंभरिता ॥ धृ. ॥

ऎसे चरित्र दावुनि जडमुढ उद्धरिले ।।भक्तवत्सल ऎसे ब्रीद मिरविलें ॥।अगाध महिमा म्हणउनि वेदश्रुति बोले ।।गंगाधरतनय सदा वंदी पाउलें ॥ ५ ॥।जय देव जय देव जय सद्‌गुरु दत्ता ।।नृसिंह सरस्वति जय विश्वंभरिता ॥ धृ. ॥

श्री स्वामी समर्थ आरती 

जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।।

छेलि खेडे ग्रामी तु अवतरलासी, राया अवतरलासी।जग्दउध्दारासाठी राया तु फिरसी।भक्तवत्सल खरा तु एक होसी, राया एक होसी।म्हणुनी शरण आलो तव चरणासी।

जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।।

त्रैगुण-परब्रम्ह तुझा अवतार, तुझा अवतार।त्याची काय वर्णु लिला पामर।शेशादिक क्षीणले नलगे त्या पार, नलगे त्या पार।तेथे जडमुढ कैसा करु मी विस्तार।

जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।।

देवाधिदेवा तु स्वामी राया, तु स्वामी राया।निरजर मुनीजन ध्याती भावे तव पाया।तुझसी अर्पण केली आपुली ही काया, आपुली ही काया।शरणागता तारी तु स्वामी राया।

जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।।

अघटीत लिला करुनी जडमुढ उध्दारिले, जडमुढ उध्दारिले।किर्ती एकूनी कानी चरणी मी लोळे।चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, मज हे अनुभवले।तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे।

जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।।

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

English
हिंदी सारांश
Web Title : Datta Jayanti 2025: Importance of Aarti after Gurucharitra Recitation

Web Summary : Datta Jayanti on December 4, 2025, emphasizes reciting the Gurucharitra Aarti after completing the scripture's parayan. It is believed that chanting the aarti and remembering Lord Datta brings auspiciousness and spiritual benefits. The article also includes aartis of other deities.
टॅग्स :datta jayantiदत्त जयंतीshree datta guruदत्तगुरुshree gurucharitraसंपूर्ण श्री गुरुचरित्र अध्यायshree swami samarthश्री स्वामी समर्थspiritualअध्यात्मिक