शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 13:33 IST

Chanakyaniti: बोलण्याच्या ओघात आपण सांगायला नको त्याही गोष्टी बोलून बसतो, म्हणून आचार्य चाणक्य यांनी पुढील तीन गोष्टी गुप्त ठेवा असे म्हटले आहे!

आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीती या महान ग्रंथात मानवी जीवनाला अनुकूल वर्तनासंबंधी नियम दिले आहेत. त्याचे पालन करणे आपल्या दृष्टीने हितावह आहे. दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींबद्दल त्यात माहिती दिली आहे. ज्यांना तत्त्वनिष्ठ आयुष्य जगायचे आहे, परिस्थितीमुळे तसेच आपल्याच हातून घडणाऱ्या चुकांमुळे होणारा त्रास टाळायचा असेल त्यांनी चाणक्यनीतीचा जरूर अभ्यास करावा आणि त्यातील बारकावे जाणून घ्यावेत. 

सादर लेखात आपण कोणती गुपितं बाळगावीत किंवा कोणत्या बाबतीत उघडपणे चारचा करू नये याचे नियम पाहणार आहोत. या नियमांचे पालन केले असता व्यक्तिगत जीवनात तर लाभ होईलच, शिवाय आपल्या नोकरी, व्यवसायात यश प्राप्त होईल हे ही नक्की. जाणून घेऊ ते नियम. 

Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!

चाणक्यनीतीनुसार पुढील तीन नियमांचे पालन करायाला हवे!

आर्थिक विषय : चाणक्यनीतीनुसार आपले आर्थिक प्रश्न, मिळकत, खर्च, उत्पन्नाचे साधन याबाबत उघडपणे चर्चा करू नये. कारण, आर्थिक स्थितीवरून व्यक्तिमत्त्व ओळखले जाते. त्यांचे समाजातले मूल्यमापन केले जाते. आर्थिक समस्या कितीही असल्या तरी चारचौघात चर्चा केल्याने त्यावर उपाय तर निघत नाहीच, उलट लोक आपल्या स्थितीचा गैरफायदा घेऊ शकतात हे लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या जवळच्या लोकांव्यतिरिक्त असे विषय शेअर करू नये, हे हिताचे ठरते. 

कौटुंबिक समस्या : आपल्या पती/पत्नी आणि मुलांबद्दल बाहेरच्या लोकांशी चर्चा करू नये. जोडीदाराचे दुर्वर्तन असले, मुलं ऐकत नसतील तरी यात सांगणार्‍याची प्रतिमा लोकांच्या दृष्टीत मलीन होते. घरात असे वातावरण असेल तर त्या व्यक्तीचा घरात वचक नाही, त्याला कोणी जुमानत नाही, किंमत देत नाही असे चित्र दिसून येते आणि त्या परिस्थितीचा फायदा दुसरे लोक घेऊ शकतात. हे लक्षात ठेवून मगच हे विषय बोलताना भान ठेवावे. अतिरिक्त माहिती पुरवू नये, अन्यथा प्रकरण आपल्याच अंगाशी येऊ शकते. 

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

मान-अपमान : असे म्हणतात, 'सुख सांगावे सकळांसी, दुःख सांगावे देवासी' कारण आपल्या दुःखाबद्दल ऐकायला कोणीही उत्सुक नसते. उलट त्या दुःखाचा, संकटाचा गैरफायदा घेणारेच अनेक असतात. म्हणून मान-सन्मान झाला तर तो चारचौघात खुशाल सांगावा, पण अपमान गपगुमान गिळून टाकावा. लोक सल्ला द्यायला आणि आपल्या चुका शोधायलाच बसलेले असतात. त्यांच्या हातात आयते कोलीत देण्यापेक्षा अपमानाचे घोट गिळून टाकणे केव्हाही चांगले. 

चाणक्यनीतीनुसार हे तिन्ही नियम पाळले तर त्यांचे खाजगी आयुष्य इतरांसाठी भांडवल होणार नाही आणि तुमची 'झाकली मूठ सव्वा लाखाची' राहील हे नक्की!

टॅग्स :Chanakya Nitiचाणक्य नीति