शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

Astrology: एखादी जोडी 'मेड फॉर इच अदर' आहे की नाही, हे पाहण्यासाठी गुण आणि ग्रह मिलन महत्त्वाचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:02 IST

Astrology:  विवाह व्हावा, टिकावा आणि फुलावा यासाठी ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून मुख्य घटक कोणते हे सांगणारी लेखमाला : भाग ४

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

पूर्वीच्या काळी विवाह जमवण्यासाठी गुण पहिले जात असत. १८ गुण जुळले तर विवाह करायला हरकत नाही. पण आता कालानुरूप ज्योतिष परिभाषा सुद्धा बदलत आहे आणि म्हणून फक्त गुण मिलन पुरेसे नाहीतर ग्रह मिलन पण करावे असे मी नक्कीच सुचवीन.

पत्रिकेतील गृहसौख्य , संसार सुख , व्यवहार , नोकरी आणि आयुष्यमर्यादा , पर्यटन , नवीन वस्तूचा लाभ ह्या सर्व गोष्टी गुण मिलनावरून समजणार नाहीत म्हणून ग्रह मिलन तितकेच महत्वाचे वाटते. आपल्या आयुष्यातील आजार, आजूबाजूच्या लोकांशी पटणे न पटणे, पैशाचा ओघ हे सर्व गुण मिलानावरून नाही समजणार.

Astrology: लगीन'गाठ' की लग्नाची 'बेडी'? 'शुक्र' तुमच्या पत्रिकेत कुठे बसलाय, ते पाहणं महत्त्वाचं!

 गुण मिलन हे ३६ गुणांचे आहे . आपले व्यक्तिमत्व, नाती गोती , नोकरी व्यवसाय , अर्थार्जन , जोडीदार , गृहसौख्य , संतती , परदेशगमन , छंद , आजार , कष्ट, संकटे ह्या सर्व गोष्टींची खोली समजायला मूळ पत्रीकेलाच हात घालावा लागतो म्हणून नुसते गुण पुरेसे नाहीत . उदा द्यायचे तर पूर्वी राक्षस गण असलेली मुलगी नको म्हणायचे, कारण ती उर्मट असू शकेल, अरे ला कारे करणारी असेल. पण अशी मुलगी ५० लोकांच्या एकत्रित कुटुंबात रमेल का, सामावून घेईल का स्वतःला ? कदाचित नाही कारण तिला स्वतंत्र विचारसरणी असेल म्हणून ती पूर्वीच्या काळात नको होती. पण आता सकाळी लवकर उठून सगळ्यांचे डबे भरून नोकरीला घराबाहेर पडणारी स्त्री ही राक्षस गणाची असली तर अंगात खूप उमेद ताकद असल्यामुळे दिवसभराचा कामाचा डोंगर उपसु शकेल. घरात पाहुणे आले, तर सगळ्यांसाठी खपून स्वयंपाक करेल, लगेच दमले दमले म्हणून हॉटेल मधून जेवण मागवणार नाही.  ह्या सर्वाचा एकत्रित विचार केल्यावर असे लक्षात येते की, बदलेल्या काळानुसार , मानवी जीवन सुद्धा बदलले आहे आणि बदलेल्या जीवन शैलीच्या वेगळ्या आहेत त्यामुळे गुण आणि ग्रह मिलन हे दोन्ही करणे क्रमप्राप्त आहे. 

Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!

ग्रह मिलन कसे करावे?

वैवाहिक सौख्य उत्तरोत्तर मिळाले तर विवाह परिपूर्ण होतो. उत्तम दर्जाचे वैवाहिक सौख्य पाहण्यासाठी सप्तम भाव , सप्तमेश , चंद्र शुक्र गुरु पाहावेत. वैवाहिक जीवनात चढ उतार , शारीरक , मानसिक त्रास आहेत का ? एखादी मानसिक विकृती , लैंगिक विकृती/ समस्या , मानसिक दुर्बलता , शारीरिक अत्याचारांना बळी पडणे ह्या गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत. आरोग्य आणि आयुष्यमान हे घटक अजिबात डावलून चालणार नाहीत. दोघांच्याही पत्रिका वैचारिक दृष्टीने ठीक असाव्यात म्हणून दोघांचीही लग्ने आणि लग्नेश पाहावे. एकाचे पारडे खाली गेले तर दुसऱ्याचे वर असावे म्हणजे एकमेकांना पूरक असावेत . 

स्त्रियांच्या पत्रिकेत द्वितीय भाव सुस्थितीत असला पाहिजे कारण तिथे आपले कुटुंब आहे. कुटुंबात रुळणारी , माणसाना आपलेसे करणारी आणि घर आपले मानणारी मुलगी संसार टिकवण्याकडे लक्ष देईल. तसेच चतुर्थ भाव कारण ते आपले घर जिथे आपले वास्तव्य असते. २ आणि ४ हे दोन्ही भाव बलवान हवेत . घरोघरी मातीच्या चुली पण त्या चुलीवर सतत आग पेटायला नको इतकेच .

लग्न षडाष्टकात नको नाहीतर वैचारिक मतभेत होतात. नवऱ्याला २५ हजार मिळाले तो म्हणेल फिक्स ला टाकू ती म्हणले दोन दिवस महाबळेश्वरला जाऊ. लग्न हे आपले शरीर देह आहे . आपण दिसतो कसे आणि आपले आयुष्य , सकारात्मकता , जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन हे सर्व लग्न भाव दर्शवते.चंद्र हा आपली मानसिकता , प्रेमाची भावना , सरलता , सहजीवनातील प्रेम , मनाची उमेद आणि ताकद दाखवतो .

भावनिक आरोग्य आणि पत्नीचे मन समजून घेण्याची क्षमता म्हणून चंद्र महत्वाचा आहे . मानसिक दौर्बल्य असेल तर व्यसनाधीनता , मानसिक  असंतुलन होण्याची शक्यता असते. रवी एकमेकांच्या षडाष्टकात नसावा नाहीतर जीवनाची उद्दिष्टे वेगवेगळी असतात . एकमेकांबद्दल ओढ आकर्षण निर्माण करणारे ग्रह मंगळ शुक्र चंद्र राहू पाहावेत .

ग्रह मिलन करताना एकमेकांच्या राशी सम सप्तक योगात , नवपंचम योगात असतील तर उत्तम .नवपंचम योगात एकच तत्व येते, त्यामुळे आचार विचार , दृष्टीकोन , आर्थिक गणिते , इतर व्यवहार चांगले असतात .चंद्र एकमेकांच्या षडाष्टकात नसावा . 

एकाचे लग्न कन्या आणि दुसऱ्याचे मीन असेल तर अशी लग्ने made for each other अशी असतात . एकमेकांचे होऊन जीवन व्यतीत करतात . एकाचा शुक्र मेष राशीत असेल आणि दुसऱ्याचा मंगळ राहू तूळ राशीत असेल तर एकमेकांच्याबद्दल मानसिक शारीरिक आकर्षण असते. तसेच एकाचा शुक्र मिथुन राशीत आणि दुसऱ्याचा मंगळ राहू पण मिथुनेत असेल तर एकमेकांसाठी आकर्षण असते . 

Astrology: पत्रिकेत विवाहाचा योगच नसेल तरी विवाह शक्य असतो का? सविस्तर जाणून घ्या!

ग्रह मिलन करताना पत्रिकेतील काही त्रासदायक योग आपण नक्कीच पहिले पाहिजेत . मुलाच्या पत्रिकेत चंद्र असेल तिथे मुलीच्या मिथुन राशीत शनी मंगळ राहू नसावा . मुलीच्या पत्रिकेत रवी असेल तिथे मुलाचा शनी राहू असतील तर तिच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात .सतत दडपण राहील मुलीला.एकाचा चंद्र असेल तिथे दुसऱ्याचा शुक्र गुरु असेल तर पत्रिका चांगल्या जुळतील. एकंदरीत गुण आणि ग्रह मिलन व्यवस्थित केले तर पुढे मनोमिलन नक्कीच होणार ह्यात दुमत नसावे.

संपर्क : 8104639230 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषmarriageलग्नrelationshipरिलेशनशिप