>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
विवाह ठरवताना गुणमिलन आणि ग्रहमिलन ही दोन्ही करणे अनिवार्य आहे; कारण गुणमिलनाचाच पुढील अध्याय म्हणजे ग्रहमिलन होय. यात सर्वात महत्त्वाच्या ठरतात त्या 'दशा' आणि 'दशास्वामींचा' परस्परांशी असलेला सुसंवाद (रजामंदी). अनेक वेळा पत्रिकेतील पापग्रहांची स्थिती विवाहात अडथळे आणणारी किंवा विवाहपश्चात दोघांमध्ये मतभेद आणि दुराव्यास कारणीभूत ठरते. ते कसे, हे आज आपण पाहूया.
पापग्रहांची स्थिती आणि परिणाम:शनी-मंगळ युती: पत्रिकेत शनी-मंगळ युती नसावी, विशेषतः १, ४, ७, ८ आणि १२ या भावांत ती अजिबात नसावी. तसेच प्रथम आणि सप्तम भावातून शनी-मंगळाचा 'प्रतियोग' (सप्तम दृष्टी) असू नये.
सप्तम भाव: ६, ७, ८ या भावांत पापग्रह असणे त्रासदायक ठरते; कारण त्यामुळे सप्तम भाव 'पापकर्तरी' योगात येतो. एकापेक्षा अधिक पापग्रह सप्तम भावात असणे किंवा पापग्रहांच्या दृष्टीत सप्तम भाव असणे हितावह नसते.
धन आणि सुख स्थान: द्वितीय भाव (धन/कुटुंब) आणि चतुर्थ भाव (सुखस्थान) यात पापग्रह असल्यास घरात कटकटी निर्माण होतात. संसार म्हणजे तडजोड असते, परंतु लग्न भावात शनी, मंगळ, हर्षल, नेपच्यून किंवा राहू यांसारखे पापग्रह असतील, तर त्यांची दृष्टी सप्तम भावावर पडते. यामुळे वैवाहिक सुख बिघडते.
Ram Navami 2026 Puja: रामनवमीला घरी पूजा कशी करावी? जन्मवेळ, पाळणा आणि राममंत्रांची संपूर्ण माहिती
मंगळाचे कुयोग: पत्रिकेत मंगळ असून त्यासोबत दोनपेक्षा अधिक पापग्रहांचे कुयोग असतील, तर वैवाहिक सौख्याची निश्चितपणे हानी होते.
दृष्टीचा प्रभाव: चतुर्थात मंगळ आणि दशमात शनी असेल, तर या दोन्ही ग्रहांची दृष्टी एकाच वेळी सप्तम भावावर पडते. अशा प्रकारे शनी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांची दृष्टी सप्तम भावावर असणे विवाहातील विघ्नांना कारणीभूत ठरते.
शुक्र आणि गुरूची स्थिती: व्यय भावात (१२ व्या स्थानी) शुक्र हा कन्या, मकर, धनु किंवा कुंभ राशीत असून त्यावर शनी-मंगळाची दृष्टी असल्यास ती त्रासदायक ठरते.
शुक्राच्या राशीतील किंवा धनु राशीतील सप्तम भावातील गुरू विवाहासाठी पोषक नसतो. मुळात हे स्थान गुरूंना मानवणारे नाही.
हर्षल आणि नेपच्यूनचा प्रभाव: सप्तम भावात हर्षल किंवा नेपच्यून असतील तर विवाहाच्या वेळी गोंधळ होणे, साखरपुडा किंवा लग्नाची तारीख ऐनवेळी बदलणे, अचानक विवाह ठरणे किंवा अचानक मोडणे, अशी गूढता दिसून येते. ही लक्षणे चांगली नाहीत. त्यामुळे अशा वेळी स्थळाची चौकशी अतिशय कसून करावी.
Ram Navami 2026: रामनवमीला मनगटावर बांधा ११ गाठींचा 'हा' धागा; तुमचे आणि कुटुंबाचे होईल संरक्षण!
मंगळ दोषाचा परिहार:
संसार म्हटला की तडजोड आलीच, मात्र मिथुन राशीतील मंगळ तडजोड करत नाही. अनेकदा मंगळाची पत्रिका सरसकट नाकारली जाते. जगातील ९०% लोकांच्या पत्रिकेत मंगळ असतो, मग काय त्यांनी विवाह करायचा नाही का? तर तसे नसते.
जर गुरूच्या दृष्टीत मंगळ असेल, तर त्याचे नकारात्मक परिणाम कमी होतात.
मंगळ स्वराशीत किंवा स्वतःच्या उच्च (मकर) राशीत असेल, तर वाईट फळे मिळत नाहीत.
पत्रिकेत गुरू आणि शुक्र बलवान असतील, तर मंगळ दोषाचा परिहार होतो.
शनीची दृष्टी सप्तम भावावर, सप्तमेशावर, शुक्र किंवा चंद्रावर असेल, तर वैवाहिक सौख्याला उशिरा सुरुवात होते.
निष्कर्ष:
विवाह सुखावह होण्यासाठी केवळ गुणमिलनावर विसंबून न राहता, ग्रहमिलन करणे अत्यंत आवश्यक आहे. गुणमिलन केल्याशिवाय विवाह करू नका, हे मी पुन्हा पुन्हा नमूद करू इच्छिते.
श्री स्वामी समर्थ!
.....Lokmat Media Group च्या डिजिटल उपक्रमांतर्गत सुरू केलेले Lokmatbhakti.com हे आध्यात्म, ज्योतिष आणि वैदिक शास्त्रांवर आधारित एक समर्पित व्यासपीठ आहे. या प्लॅटफॉर्मवर कुंडली विश्लेषण, अंकशास्त्र, विवाह जुळवणी (matchmaking) तसेच वास्तु मार्गदर्शन यांसारख्या सेवा पारंपरिक पद्धतींनुसार तयार करून दिल्या जातात. Lokmatbhakti.com वर उपलब्ध असलेले अहवाल आणि मार्गदर्शन हे अनुभवी तज्ञांच्या सल्ल्यावर आधारित असून त्यात अचूकता आणि प्रामाणिकपणाला विशेष महत्त्व दिले जाते. याशिवाय, येथे उपलब्ध असलेले धार्मिक आणि आध्यात्मिक कंटेंटही विश्वसनीय स्रोतांवर आधारित असल्याने वाचकांमध्ये याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.
Web Summary : Horoscope matching is crucial before marriage. Afflictions from malefic planets like Saturn and Mars in specific houses (1, 4, 7, 8, 12) can cause marital discord. The positions of Venus and Jupiter also matter. Analyse thoroughly to avoid problems.
Web Summary : विवाह से पहले कुंडली मिलान महत्वपूर्ण है। शनि और मंगल जैसे अशुभ ग्रहों की विशिष्ट भावों (1, 4, 7, 8, 12) में स्थिति वैवाहिक कलह का कारण बन सकती है। शुक्र और बृहस्पति की स्थिति भी मायने रखती है। समस्याओं से बचने के लिए अच्छी तरह विश्लेषण करें।