यावर्षीची २७ फेब्रुवारी रोजी आलेली आमलकी एकादशी(Amalaki Ekadashi 2026) अत्यंत विशेष मानली जात आहे, कारण तब्बल १५१ वर्षांनंतर असा दुर्मिळ योगायोग जुळून येत आहे. यावर्षीच्या विशेष नक्षत्रांच्या स्थितीमुळे हा दिवस अत्यंत फलदायी ठरणार आहे. या पवित्र दिवशी आवळा वृक्षाची आणि भगवान विष्णूंची सेवा केल्याने पिढ्यानपिढ्यांचे दारिद्र्य दूर होऊ शकते. विशेषतः घरातील स्त्रियांनी या दिवशी केलेले 'कणकेच्या दिव्याचे' दान कुटुंबाचे भाग्य उजळवू शकते.
आमलकी एकादशी २०२६: 'या' ७ राशींना होणार धनलाभ, तर ५ राशींना सावधतेचा इशारा!
आमलकी एकादशीला 'अक्षय फळ' देणारी एकादशी म्हटले जाते. आवळ्याच्या झाडावर विष्णू आणि शंकर यांचे अस्तित्त्व असते. तसेच या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद पृथ्वीवर असतो. यासाठी या दिवशी ज्योतिष शास्त्रात सुचवलेला उपाय करा.
कणकेच्या दिव्याचे महत्त्व आणि विधी
शास्त्रात कणकेचा दिवा (पिठाचा दिवा) हा अत्यंत शुद्ध आणि मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो. दारिद्र्य निवारण आणि करिअरमधील प्रगतीसाठी स्त्रियांनी खालीलप्रमाणे उपाय करावा:
१. आवळा वृक्षाखाली दीपदान:
संध्याकाळी शुद्ध तुपाचा कणकेचा दिवा तयार करावा. हा दिवा आवळ्याच्या झाडाखाली प्रज्वलित करावा. आवळ्याच्या झाडात विष्णू-महेशाचा वास असतो, त्यामुळे येथे दिवा लावल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
२. विष्णू किंवा विठ्ठल मंदिरात दीपदान:
घरातील स्त्रियांनी जवळच्या कोणत्याही विष्णू किंवा विठ्ठल मंदिरात जाऊन देवाच्या उजव्या बाजूला कणकेचा दिवा लावावा. दिवा लावताना मनामध्ये आपल्या पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करावी. यामुळे करिअरमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.
आमलकी एकादशी २०२६: आर्थिक चणचण पाचवीला पुजलीये? २७ फेब्रुवारी रोजी करा आवळ्याचा 'हा' उपाय!
या उपायाचे 'हे' होतात ३ मोठे फायदे:
आरोग्य प्राप्ती: आवळ्याच्या झाडाखाली दिवा लावल्याने घरातील आजारपण दूर होते आणि दीर्घायुष्य लाभते.
करिअरमध्ये यश: विष्णू मंदिरात दीपदान केल्याने नोकरी-व्यवसायातील अडचणी दूर होऊन प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात.
लक्ष्मीची कृपा: १५१ वर्षांनंतरच्या या योगावर दीपदान केल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि आर्थिक चणचण भासत नाही.
Vastu Tip: घरासमोर चिंचेचे झाड अशुभ मानतात, पण खिशात चिंचेच्या बिया ठेवल्याने उजळतं नशीब?
पूजेचा विशेष मंत्र:
दिवा लावताना 'ओम नमो भगवते वासुदेवाय' किंवा 'ओम धात्र्ये नम:' या मंत्राचा जप करावा. पूजेनंतर हा दिवा तिथेच शांत होऊ द्यावा, पूजा होईपर्यंत तो स्वतःहून विझू नये याची काळजी घ्यावी.
Web Summary : Amalaki Ekadashi 2026 is special after 151 years. Offering a dough lamp near an Amla tree or Vishnu temple on this day brings prosperity. It removes obstacles and ensures good health, career success, and Lakshmi's blessings for the family.
Web Summary : आमलकी एकादशी २०२६, १५१ वर्षों बाद विशेष। इस दिन आंवला वृक्ष या विष्णु मंदिर के पास आटे का दीपक जलाने से समृद्धि आती है। यह बाधाओं को दूर करता है और परिवार के लिए अच्छा स्वास्थ्य, करियर में सफलता और लक्ष्मी का आशीर्वाद सुनिश्चित करता है।