Akshaya Tritiya 2026: 'या' कारणांमुळे अक्षय्य तृतीयेला मिळाले साडे तीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचे स्थान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 07:05 IST2026-04-17T07:00:01+5:302026-04-17T07:05:02+5:30

Akshaya Tritiya 2026: १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे, या दिवसाला एवढे महत्त्व येण्याची वेगवेगळी कारणं जाणून घ्या, सणाचा आनंद द्विगुणीत होईल. 

Akshaya Tritiya 2026: Due to 'these' reasons, Akshaya Tritiya got an important place among the three and a half Muhurtas! | Akshaya Tritiya 2026: 'या' कारणांमुळे अक्षय्य तृतीयेला मिळाले साडे तीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचे स्थान!

Akshaya Tritiya 2026: 'या' कारणांमुळे अक्षय्य तृतीयेला मिळाले साडे तीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचे स्थान!

अक्षय्य तृतीया हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी शुभ कार्ये केली जातात. हिंदू दिनदर्शिकेनुसार अक्षय्य तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येते. यावेळी १९ एप्रिल २०२६  रोजी अक्षय्य तृतीया(Akshaya Tritiya 2026) येत आहे. त्याची शुभ वेळ, महत्त्व आणि उत्सव साजरा करण्यामागचे कारण जाणून घेऊया. 

हे ही वाचा : Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!

अक्षय्य तृतीयेचा दिवस साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी कपडे, सोन्या-चांदीचे दागिने, वाहन, घर, मालमत्ता इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी धार्मिक कार्यासोबत दान केल्याने शुभ फळ मिळते. तसेच संपत्तीत वाढ होते.

अक्षय्य तृतीया साजरी करण्याची कारणे

>> पहिल्या पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला. म्हणूनच हा दिवस अक्षय्य तृतीया म्हणून साजरा केला जातो. यासोबतच या दिवशी परशुरामाची जयंती म्हणूनही साजरा केला जातो. 

>> दुसर्‍या मान्यतेनुसार, या दिवशी भगीरथच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन गंगा देवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली.

>> तिसऱ्या मान्यतेनुसार माता अन्नपूर्णाचाही जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी स्वयंपाकघर आणि अन्नधान्याची पूजा करण्यासोबतच भुकेल्यांना अन्नदान करावे, असे सांगितले जाते. 

हे ही वाचा : Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!

>> अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान शंकरांना महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी कुबेराची पूजा करण्यास सांगितले होते. या कारणास्तव अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास शुभ फळ मिळते.

>> महर्षी वेद व्यास यांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महाभारताचे लेखन सुरू केले. या ग्रंथात श्री भगवद्गीतादेखील समाविष्ट आहे. असे मानले जाते की या दिवशी  गीतेच्या १८ व्या अध्यायाचे पठण केले पाहिजे.

>> नर-नारायण देखील अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अवतरले असे मानले जाते. म्हणूनच ते शुभ मानले जाते.

>> महाभारतानुसार, या दिवशी भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासात 'अक्षय्य पात्र' दिले होते. अक्षय्य पात्र कधीच रिकामे नसते. ते नेहमी अन्नाने भरलेले असते, ज्यातून पांडवांना अन्न मिळत असे. 

हे ही वाचा : चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!

>> अशी अक्षय्य संपन्नता आपल्याही आयुष्यात यावी आणि आपल्याला अपेक्षित असलेला आनंद अक्षय्यपणे टिकून राहावा यासाठी अक्षय्य तृतीया लक्ष्मी पूजा करून साजरी केली जाते. 

Web Title : अक्षय तृतीया 2026: इस कारण से है साढ़े तीन मुहूर्तों में महत्वपूर्ण!

Web Summary : अक्षय तृतीया हिंदू धर्म में शुभ मानी जाती है, जो 19 अप्रैल 2026 को है। यह साढ़े तीन मुहूर्तों में से एक है, जिस दिन सोना-चांदी खरीदना, दान करना और लक्ष्मी जैसी देवताओं की पूजा करना शुभ होता है। यह दिन भगवान परशुराम के जन्म, गंगा के अवतरण और अन्नपूर्णा के जन्म का प्रतीक है।

Web Title : Akshaya Tritiya 2026: Significance and reasons for celebration explained.

Web Summary : Akshaya Tritiya, a highly auspicious day in Hinduism, falls on April 19, 2026. It's one of the three and a half most auspicious days for buying valuables, donating, and worshipping deities like Lakshmi. The day marks the birth of Lord Parashuram, Ganga's descent, and Annapurna's birth, symbolizing prosperity and abundance.