जिल्हा परिषद सीईओ अजित कुंभार गेले, अजित पवार आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:38 IST2021-08-21T04:38:55+5:302021-08-21T04:38:55+5:30

बीड : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची बृहन्मुंबई महापालिकेत सहायक आयुक्त पदावर बदली झाली. त्यांच्या जागी ...

Zilla Parishad CEO Ajit Kumbhar went, Ajit Pawar came | जिल्हा परिषद सीईओ अजित कुंभार गेले, अजित पवार आले

जिल्हा परिषद सीईओ अजित कुंभार गेले, अजित पवार आले

बीड : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची बृहन्मुंबई महापालिकेत सहायक आयुक्त पदावर बदली झाली. त्यांच्या जागी पुण्याहून जातपडताळणी समितीचे अध्यक्ष अजित पवार हे येत आहेत. दरम्यान, कोविडकाळात अजित कुंभार यांनी मोठे योगदान दिले. शिस्तप्रिय व कर्तव्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द स्मरणात राहील. भारतीय प्रशासन सेवेतील सात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दि. २० ऑगस्ट रोजी ग्रामविकास विभागाने काढले. यात बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांचा समावेश आहे. अडीच वर्षांपूर्वी कुंभार हे बीडमध्ये रुजू झाले होते. जि.प.मधील पदाधिकाऱ्यांशी त्यांचा कधीच सूर जुळला नाही. प्रशासनात शिस्त आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे अनेक संचिका त्यांच्याकडे प्रलंबित राहिल्या, त्यामुळे ते चर्चेत होते. कोविडमध्ये त्यांनी मोठे योगदान दिले. ऑक्सिजन पुरवठ्यासह रुग्णांसाठी खाटा, रेमडेसिविर उपलब्ध करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या बदलीची चर्चा वर्षभरापासून सुरू होती. त्यांना आता बृहन्मुंबई महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर नेमण्यात आले. बीड जिल्हा परिषद सीईओ म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचे अजित पवार यांची नियुक्ती झाली आहे.

....

Web Title: Zilla Parishad CEO Ajit Kumbhar went, Ajit Pawar came