सांगा नेमके काय घडले होते? मृत यश ढाकाच्या मित्र-मैत्रिणींची आणि ‘त्या’ मुलीचीही चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 15:23 IST2025-10-04T15:20:36+5:302025-10-04T15:23:37+5:30

Yash Dhaka Murder Case: पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडून आढावा : युवासेना जिल्हाप्रमुख अजूनही मोकाटच

Yash Dhaka Murder Case: Tell me exactly what happened? Yash Dhaka's friends and 'that' girl were also questioned | सांगा नेमके काय घडले होते? मृत यश ढाकाच्या मित्र-मैत्रिणींची आणि ‘त्या’ मुलीचीही चौकशी

सांगा नेमके काय घडले होते? मृत यश ढाकाच्या मित्र-मैत्रिणींची आणि ‘त्या’ मुलीचीही चौकशी

बीड : शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. या प्रकरणात तीन आरोपी अटक झाले असून शिंदे गटाचा युवासेना जिल्हाप्रमुख गणेश शिराळे अजूनही मोकाटच आहे, तर दुसऱ्या बाजूला पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी शुक्रवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेत बसून यशच्या मित्र आणि मैत्रिणींची कसून चौकशी केली. त्या रात्री काय घडले? आणि नेमके कारण काय? याची माहिती घेण्यात आली.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून खुनांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांचा कसलाही धाक नसल्याचा आरोप केला जात आहे. अशातच बीड शहरातील गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स परिसरात यश ढाका याचा भर रस्त्यावर खून करण्यात आला. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक आक्रमक झाले. बाबुराव पोटभरे, डॉ. जितेंद्र ओव्हाळ, सुजात आंबेडकर आदींनी यावर आवाज उठविला. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनाच एसआयटी (SIT) आणि बदलीची मागणी करण्याचा इशारा दिल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर देवेंद्र ढाका आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एसपींची भेट घेत सर्व आरोपींना अटक करून कडक कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

‘त्या’ मुलीचीही केली चौकशी
यश ढाका याचा खून मुलीला का बोलतो या कारणावरून झाल्याचे सांगण्यात आले होते. या प्रकरणातील मुलीचीही चौकशी करण्यात आली. सोबतच त्याचे मित्र आणि व्हायरल व्हिडीओ, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आदींची उपस्थिती होती.

ढाका कुटुंबीयांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट
मोकाट असलेल्या दोन आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी ढाका कुटुंबीयांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेतली. ॲड. आंबेडकर यांनी तत्काळ वकिलांशी चर्चा केली, तसेच समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले व संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, अमरसिंग ढाका, डॉ. नितीन सोनवणे, ज्ञानेश्वर कवठेकर, पुरुषोत्तम ऊर्फ गोटू वीर, लखन जोगदंड आदी उपस्थित होते.

Web Title : बीड: ढाका हत्याकांड की जांच, पुलिस ने दोस्तों और अहम लड़की से पूछताछ की

Web Summary : बीड में यश ढाका की हत्या की पुलिस जांच कर रही है, दोस्तों और मामले से जुड़ी एक लड़की से पूछताछ की जा रही है। तीन गिरफ्तार, लेकिन एक प्रमुख संदिग्ध अभी भी फरार है। परिवार न्याय की मांग कर रहा है, प्रकाश आंबेडकर से मुलाकात कर समर्थन मांगा।

Web Title : Beed: Police Investigate Dhaka Murder, Question Friends and Key Girl

Web Summary : Police investigate Yash Dhaka's murder in Beed, questioning friends and a girl linked to the case. Three are arrested, but a key suspect remains at large. The family seeks justice, meeting Prakash Ambedkar for support.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.