धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 14:50 IST2025-12-21T14:48:15+5:302025-12-21T14:50:08+5:30
धारूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झली...

धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहेत. या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील धारूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. धारूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झली. राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रकाश सोळंके यांनी येथे वर्चस्व मिळवले.
खरे तर, येथे भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके, असा राजकीय सामना रंगला होता. ही निवडणूक पंकजा मुंडेसांठी प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र, येथे सर्वच्या सर्व १७ जागांवरही भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने हा पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
या निकालासंदर्भात बोलताना काय म्हणाल्या पंकडा मुंडे? -
या निकालासंदर्भात पत्रकारांशी बोलताना पंकजा म्हणाल्या, “आम्ही परळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाबरोबर युती केली होती. इतर ठिकाणी आम्ही लढलो. त्यापैकी परळी नगर परिषद, गेवराई नगर परिषद आणि अंबाजोगाई नगर परिषदेत आम्ही जिंकलो आहोत. इतर ठिकाणी अगदी टस्सल सुरू आहे. कारण तेथे गेल्या पाच वर्षांत आमचे आमदार नाहीत. कुठली सत्ता नाही. कार्यकर्त्यांना फारसा आधार न देताही ते संपूर्ण शक्तीने उबे राहिले. धारूरमध्ये आमचा निसटता पराभव झाला आहे. मला आनंद आहे. आमचा, धारूरमध्ये थोडक्यात पराभव झाला असला तरी, आम्ही अंबाजोगाई जी कधीही मिळवली नाही, ती मिळवली आहे. जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आणि प्रेम दाखवत सकारात्मक कौल दिला. त्याबद्दल मी जनतेचे आभार मानते."
...म्हणून महत्वाचे आहेत हे निकाल -
दरम्यान, साधारणपणे गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्तानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशानंतर आता होत आहेत. यांपैकी राज्यातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. ज्याचे निकाल आज जाहीर होत आहेत. महत्वाचे म्हणजे, राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर या निवडणुका पार पडल्या. यामुळे यांच्या निकालांनाही विशेष महत्त्व आहे.