शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट नाली करून प्लाॅटमध्ये सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

माजलगाव : शहरातील प्रभाग एकमधील छत्रपतीनगर या भागात नगरपालिकेने नाली बांधकाम करून दुसऱ्या नालीला जोडणे आवश्यक होते. अर्धवट नाली ...

माजलगाव : शहरातील प्रभाग एकमधील छत्रपतीनगर या भागात नगरपालिकेने नाली बांधकाम करून दुसऱ्या नालीला जोडणे आवश्यक होते. अर्धवट नाली करून सर्व पाणी या भागातील एका प्लॉटमध्ये सोडून देण्यात आल्याने या भागात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

माजलगाव शहरालगत असलेल्या बायपास रोडवर छत्रपतीनगर ही कॉलनी नवीन झाली होती. या भागात सुविधा नसल्याने नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिकेकडे पत्रव्यवहार करून, या भागात रस्ते व नाल्या करून न दिल्यास, या भागातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात होते. यानंतर नगरपालिकेने या भागातील नाल्या बांधकाम सुरू केले.

इतर भागातील पाणी बाहेर काढून देणे आवश्यक असताना अर्धवट नाली करण्यात आली आहे. ही अर्धवट नाली केल्यामुळे येणारे पाणी एका प्लॉटमध्ये सोडण्यात आले आहे.

प्लॉटमध्ये इतर ठिकाणचे पाणी येऊन जमा होत असल्याने आजुबाजूला राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होऊ लागला आहे. त्याचबरोबर या भागात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

याबाबत या भागातील नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना भेटून याबाबत सांगितले.

महिन्यापूर्वी मुख्याधिकारी यांनी या ठिकाणी भेट दिली होती. परंतु त्यानंतर त्यांनी पुढे काहीच केले नाही. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात या भागातील नागरिक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

या भागातील नागरिकांना त्रास व्हावा, या उद्देशाने ही नाली जोडू नये, असे गुत्तेदाराला एका नगरसेवकाने सांगितल्याने ही नाली जोडण्यात आली नसल्याचे या भागातील नागरिक सांगत होते. या भागातील एकाने घराचे बांधकाम जास्त करून नाली देखील उंच बांधलेली असल्याने या ठिकाणावरून पाणी जात नाही. संबंधित बांधकामधारकास नोटीस देऊन त्यांची नाली पाडण्यात येईल. त्यानंतर ही नाली पुढे जोडण्यात येईल.

- शेख मंजूर, नगराध्यक्ष

050721\purusttam karva_img-20210705-wa0056_14.jpg