वाळूघाटाच्या तपासणीवर फिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST2021-06-01T04:25:16+5:302021-06-01T04:25:16+5:30

गेवराई : तालुक्यातील तीन वाळूघाटातून ठेकेदारांनी क्षमतेपेक्षा जास्त खड्डे करून, मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केल्याप्रकरणी तपासणीसाठी आलेले महसूल विभागाचे ...

Water flowing on the sand dunes | वाळूघाटाच्या तपासणीवर फिरले पाणी

वाळूघाटाच्या तपासणीवर फिरले पाणी

गेवराई : तालुक्यातील तीन वाळूघाटातून ठेकेदारांनी क्षमतेपेक्षा जास्त खड्डे करून, मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केल्याप्रकरणी तपासणीसाठी आलेले महसूल विभागाचे जालना आणि बीड येथील संयुक्त पथक मोजमाप न करताच परत गले. वाळूघाटातील खड्डयांची इटीएस मशीनद्वारे मोजणी करण्यासाठी पथक आले होते. मात्र, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने, याचे मोजमाप करणे शक्य नसल्याचा अहवाल देत, हे पथक परतल्याचे सांगण्यात आले.

भाजप आमदार. लक्ष्मण पवार यांनी वाळू माफियांविरुद्ध आक्रमक भूमिका घेत, महसूलच्या पथकासह वाळू घाटावर जाऊन पंचनामा केल्यानंतर, ३० मे रोजी जालना व बीड येथील महसूल विभागाचे पथक धडकले. तालुक्यातील राक्षसभुवन, सावळेश्वर, पांचाळेश्वर येथील वाळू घाटातील नदीपात्रात क्षमतेपेक्षा जास्त वाळू उपशामुळे पडलेले खड्डे इ.टी.एस मशीनद्वारे हे पथक मोजणी करणार होते. यावेळी बीडचे उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, जालन्याचे अप्पर जिल्हाधिकारी पिनाटे, गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे, गौण खनिज अधिकारी अडसूळ, अंबडचे तहसीलदार खैरनार, तसेच मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांचा या पथकात समावेश होता. पथकाने राक्षसभुवन, पांचाळेश्वर, सावळेश्वर येथील नदीपात्राजवळ जाऊन पाहणी केली. मात्र, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने हे मोजमाप शक्य नव्हते. त्यामुळे स्थळ पाहणीचा पंचनामा करून, तसा अहवाल जालना येथील अप्पर जिल्हाधिकारी पिनाटे यांच्याकडे दिला. हा अहवाल ते विभागीय आयुक्तांकडे सादर करणार आहेत.

===Photopath===

310521\sakharam shinde_img-20210531-wa0031_14.jpg

Web Title: Water flowing on the sand dunes