विनायक विद्यालय गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:35 IST2021-08-23T04:35:15+5:302021-08-23T04:35:15+5:30

बीड : विनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी, बारावी व व्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रथम आलेल्या ...

Vinayak Vidyalaya meritorious felicitation | विनायक विद्यालय गुणवंतांचा सत्कार

विनायक विद्यालय गुणवंतांचा सत्कार

बीड : विनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी, बारावी व व्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पेठ बीड भागातील न.प. सभापती विकास जोगदंड, बाळासाहेब गुंजाळ, शेख इलियास, मुख्याध्यापक तथा प्राचार्य प्रशांत पवळ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कीर्ती पांगारकरसह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी स्व. काकू व सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याचे या शाळेतील माजी विद्यार्थी विष्णुदास बियाणी यांनी वडील स्व. विठ्ठलदास बियाणी यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम व ट्रॉफी देऊन कौतुक केले. यावेळी विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना राजेंद्र पवार यांनी प्रत्येकी पाचशे रुपयांचे रोख पारितोषिक देऊन प्रोत्साहित केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रशांत पवळ यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश साळुंखे यांनी केले. बेग यांनी आभार मानले.

220821\22_2_bed_1_22082021_14.jpg

गुणवंतांचा सत्कार

Web Title: Vinayak Vidyalaya meritorious felicitation