खामगाव-पंढरपूर महामार्गावर दुचाकी-पिकअपचा अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 18:34 IST2024-01-29T18:33:16+5:302024-01-29T18:34:34+5:30
अपघातात पिकअपमधील एकजण गंभीर जखमी झाला आहे

खामगाव-पंढरपूर महामार्गावर दुचाकी-पिकअपचा अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
दिंद्रुड : खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील तेलगाव-धारूर रस्त्यावर दुचाकी-पिकअपचा अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून पिकअपमधील एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास झाला.
तेलगाव साखर कारखाना परिसरात चौंडी (ता. धारूर) येथील इरले बंधू यांचे किराणा दुकान आहे. रविवारी रात्री ते दुकान बंद करून पिकअपने (एमएच. ४४, ९४५३) गावाकडे जात होते. तेलगाव-कारीदरम्यान समोरून येणाऱ्या दुचाकीचा आणि (एमएच. २१, बी.आर. ३१६०) पिकअपचा अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार राजू कुलाबा मिलक (रा. नागठाणा, ता. बदनापूर) हे जागीच ठार झाले, तर पिकअपमधील अजय मधुकर इरले गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी बीड येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच दिंद्रुड ठाण्याचे पोलिस कर्मचारी बालाजी सुरेवाड, अनिल भालेराव घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला. अपघातानंतर पोलिसांनी रस्त्यावरील ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली.