शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

२ लाख १४ हजार चिमुकल्यांना दोन थेंब जीवनाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:27 IST

बीड : कोरोना लसीकरणामुळे १७ जानेवारीची पल्स पोलिओ माेहीम ३१ जानेवारीला होत आहे. जिल्ह्यात ० ते ५ वर्षे वयोगटातील ...

बीड : कोरोना लसीकरणामुळे १७ जानेवारीची पल्स पोलिओ माेहीम ३१ जानेवारीला होत आहे. जिल्ह्यात ० ते ५ वर्षे वयोगटातील २ लाख १४ हजार ८८ चिमुकल्यांना दोन थेंब जीवनाचे दिले जाणार आहेत. यासाठी बुथ, मोबाईल पथक. ट्रांझीट टिमचेही नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या २६ लाख ८४ हजार ८८९ एवढी आहे. या सर्वांचे सर्वेक्षण केले असता जिल्ह्यात ० ते ५ वर्षे वयोगटातील २ लाख १४ हजार ८८ लाभार्थी निघाले. त्यांना पोलीओ डोस देण्यासाठी आरोग्य विभागाने नियाेजन केले असून तयारी अंतीम टप्यात आहे. याबाबत जिल्हा, तालुका व आरोग्य केंद्रास्तरावर प्रशिक्षणही देण्यात आले आहे. वाड्या, वस्त्या, बांधकामाचे ठिकाण, उसतोडणी कामगार, रस्ते यासह जे स्थलांतरीत झाले आहेत, अशांची माहिती संकलीत केली आहे. स्थलांतरीत लाभार्थ्यांची यादी संबंधित जिल्ह्यातील आरोग्य विभागाला पाठवून त्यांना पाेलीओ डोस देण्याचे नियोजनही आरोग्य विभागाने केले आहे. आता ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करून आपल्या चिमुकल्यांना पोलीओमुक्त ठेवण्यासाठी दोन थेंब द्यावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.आर.बी.पवार यांनी केले आहे.

कोट - फोटो

जिल्ह्याला ३ लाख ६६ हजार पोलीस डोस प्राप्त झाले असून ० ते ५ वर्षे वयोगटातील २ लाख १४ हजार ८८ लाभार्थी आहेत. ३१ जानेवारीला ही मोहीम असेल. प्रत्येकाने आपल्या पाल्याला हा डोस द्यावा. यापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली आहे. तसे नियोजन केले आहे. जनजागृतीही केली असून पालकांनी सहकार्य करावे.

डॉ.आर.बी.पवार

जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

अशी आहे आकडेवारी

जिल्ह्याची लोकसंख्यात - २६८४८८९

लाभार्थी - २१४०८८

पोलीओ डोस प्राप्त - ३६६०००

एकूण बूथ - २३५७

आरोग्य सेवक - ५९७१

पर्यवेक्षक - ९९९

आरोग्य संस्था - ६७

मोबाईल पथक - १५२

ट्रांझीट पथक - १०९

वेळ - सकाळी ८ ते सायं.५ वाजेपर्यंत