धारूर घाटात टायर फुटल्याने ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:25 IST2021-05-31T04:25:09+5:302021-05-31T04:25:09+5:30

खामगाव-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच धारूर येथील घाट हा ...

The truck overturned due to a flat tire in Dharur Ghat | धारूर घाटात टायर फुटल्याने ट्रक उलटला

धारूर घाटात टायर फुटल्याने ट्रक उलटला

खामगाव-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच धारूर येथील घाट हा अरूंद स्वरूपाचा व धोकादायक वळणाचा आहे. घाटात नेहमीच अपघात घडण्याची मालिका सुरू आहे. रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास धारूरकडून माजलगावकडे सिमेंट रसायनाची वाहतूक करणारा ट्रक घाटातून जात होता. ऐन वळणाच्या ठिकाणी येताच ट्रकच्या समोरचे टायर फुटले. चालकाने ट्रक दरीत जाऊ नये म्हणून प्रसंगावधान राखून ट्रक डोंगरावर चढविला. या प्रयत्नात ट्रक उलटला. खिडकीच्या काच फोडून चालक सुखरूप बाहेर आला. त्यास किरकोळ दुखापत झाली असून धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

===Photopath===

300521\img-20210530-wa0204_14.jpg

Web Title: The truck overturned due to a flat tire in Dharur Ghat