घाटनांदूर येथे ट्रामा केअर सेंटर उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST2021-05-30T04:27:05+5:302021-05-30T04:27:05+5:30

घाटनांदूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दर्जावाढ करण्यात येणार असून लवकरच युद्धपातळीवर पाठपुरावा करून ट्रामा केअर सेंटर ...

Trauma Care Center to be set up at Ghatnandur | घाटनांदूर येथे ट्रामा केअर सेंटर उभारणार

घाटनांदूर येथे ट्रामा केअर सेंटर उभारणार

घाटनांदूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दर्जावाढ करण्यात येणार असून लवकरच युद्धपातळीवर पाठपुरावा करून ट्रामा केअर सेंटर स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांनी दिली.

पालकमंत्री धनंजय मुंडे आणि जि. प. अध्यक्षा शिवकन्या शिवाजी सिरसाट यांच्या प्रयत्नातून बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास प्राप्त झालेल्या सात रुग्णवाहिकांचे लोकार्पण शनिवारी घाटनांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात घाटनांदूर, मोहखेड ,वडवणी, शिरूर कासार, कडा, रूईधारूर, चऱ्हाटा येथील आरोग्य केंद्रासाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले, तसेच अंबाजोगाईच्या स्त्री रुग्णालयास दोन, लोखंडी सावरगावच्या वृद्धत्व मानसिक उपचार केंद्रास दोन व धानोरा ग्रामीण ग्रामीण रुग्णालयास एक अशा चार रुग्णवाहिकांचेही लोकार्पण करण्यात आले. यावेळी सिरसाट म्हणाल्या, जिल्ह्यात ५५ प्राथमिक आरोग्य केंद्र असून सर्वच केंद्रास टप्प्याटप्प्याने वातानुकूलित व आरोग्य सुविधा असलेल्या सुसज्ज रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत, तसेच आणखी २५ रुग्णवाहिका मिळणार आहेत. याप्रसंगी रा. काँ. नेते शिवाजीराव सिरसाट, बाजार समितीचे प्रशासक गोविंद देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे, धारूरच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती डिकले, डॉ. विलास घोळवे, पं. स. सदस्य मच्छिंद्र वालेकर, सरपंच ज्ञानोबा जाधव, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, बन्सीसाहेब जाधव, भगवान सारडा, शेख मुख्तार, आरोग्य विभागाचे एस. के. गोरे, सुरेश काकडे, प्रकाश जाधव, गणेश शिंदे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका मिळाव्यात म्हणून पालकमंत्री मुंडे व जि. प. अध्यक्ष सिरसाट यांच्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोट्यातील निधीतून वातानुकूलित व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या सात रुग्णवाहिका मिळाल्या.

===Photopath===

290521\narshingh suryvanshi_img-20210529-wa0042_14.jpg

Web Title: Trauma Care Center to be set up at Ghatnandur