लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:39 IST2021-08-20T04:39:11+5:302021-08-20T04:39:11+5:30

अंबाजोगाई येथील वर्षीय विधवा महिला पतीच्या निधनानंतर दोन वर्षांपासून आई-वडिलांकडे राहते. तिच्या शेजारी राहणारी ३० वर्षं वयाची ...

Torture of a widow by showing the lure of marriage | लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेवर अत्याचार

अंबाजोगाई येथील वर्षीय विधवा महिला पतीच्या निधनानंतर दोन वर्षांपासून आई-वडिलांकडे राहते. तिच्या शेजारी राहणारी ३० वर्षं वयाची महिला व या कुटुंबाचे कौटुंबिक संबंध आहेत. शेजारी महिलेचा भाऊ गजानन मदनराव पेटकर (वय २८) व्यवसाय चालक रा. गंगाखेड जि. परभणी हा अधूनमधून बहिणीकडे राहण्यासाठी येत असे. त्याने पीडित महिलेशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. विवाहास संमती मिळाली. मात्र तो लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाल्याने विवाह लांबणीवर पडला. लग्न ठरलेले असल्यामुळे त्यांच्या घरी पीडित महिला छोटेमोठे काम करण्यासाठी जात असे. या संधीचा फायदा घेत गजानन याने २५ फेब्रुवारी रोजी दुपारी एकांताचा फायदा घेऊन पीडित महिलेवर जबरदस्ती अत्याचार केला. विवाहाचे आमिष दाखवून वारंवार कुकृत्य केले. नंतर त्याने अचानक दुसऱ्या मुलीशी विवाह केला. ही बाब समजल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून पीडितेची फसवणूक केली, अशी तक्रार पीडितेने अंबाजोगाई शहर पोलिसात दिली. या प्रकरणी गजानन पेटकर याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा नोंद झाला आहे. आरोपी फरार असून तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Web Title: Torture of a widow by showing the lure of marriage